खमंग व्हेजीटेबल बिर्याणी: व्हेजीटेबल बिर्याणी ही एक चवीस्ट व पौस्टिक डीश आहे. ह्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत. ही बिर्याणी बनवायला अगदी सोपी व व लवकर होणारी आहे. तसेच ही फार मसालेदार नाही त्यामुळे लहान मुलांना व मोठ्या वयाच्या व्यकतीना पण छान आहे.
The English language version of this Biryani is published here- Spicy Vegetable Biryani
खमंग व्हेजीटेबल बिर्याणी बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
१ कप बासमती राईस
१ टे स्पून तूप/तेल
२ हिरवे वेलदोडे,
२ दालचीनी तुकडे
२ लवंग
२ तमलपत्र
५-६ काळे मिरे, मीठ चवीने
२ कप पाणी १/२ कप दुध व ५-६ कड्या केसर
बिर्याणीसाठी भाज्या:
१ टे स्पून तूप/तेल
१ मध्यम कांदा (चिरून)
३ मध्यम टोमाटो (चिरून)
६-७ लसून पाकळ्या (चिरून)
२-३ हिरव्या मिरच्या (चिरून)
१/४ कप हिरवे मटार
१/४ कप गाजर
१/२ कप फ्लॉवर
१ टी स्पून जिरे
१/२ कप पाणी, मीठ
लाल मिरची पावडर व मिरे पावडर आपल्या चवीने
१/४ टी स्पून हळद
१/२ टी स्पून गरम मसाला पावडर
एक मोठा उकडलेला बटाटा बिर्याणी लावतांना भांड्याच्या बुडाला ठेवण्यासाठी म्हणजे बिर्याणीचा भात भांड्याला खाली लागत नाही व बटाट्याचा सुगंध पण बिर्याणीला छान येतो.
कृती: तांदूळ धुवून १/२ तास बाजूला ठेवा. जाड बुडाच्या भांड्यात तेल/तूप गरम करून त्यामध्ये हिरवे वेलदोडे, लवंग, तमलपत्र, मिरे, दालचीनी, मिरे, जिरे, मीठ, तांदूळ व दोन कप गरम पाणी घालून बोटचेप्या भात शिजवून घ्या. मग त्यामध्ये केसरचे दुध घालून मिक्स करून ५ मिनिट झाकून ठेवा.
एका कढईमध्ये तेल/तूप गरम करून कांदा, टोमाटो, लसून घालून दोन मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, मिरे पावडर, हळद, गरम मसाला, चिरलेल्या भाज्या, १/२ कप पाणी घालून भाज्या ५ मिनिट वाफवून घ्या.
मग शिजवलेल्या भाताचे तीन भाग करावेत व शिजवलेल्या भाज्यांचे दोन भाग करावेत.
जाड बुडाच्या भांड्यात उकडलेल्या बटाट्याच्या चकत्या ठेवाव्या त्यावर थोडा भात पसरवावा मग त्यावर शिजवलेल्या निम्या भाज्या, भात, भाज्या मग भात, भाज्या व भात असे लेयर देवून एक दणदणीत वाफ काढावी.
गरम गरम व्हेजीटेबल बिर्याणी रायत्या बरोबर सर्व्ह करावी.