पनीर पुदिना राईस: पनीर पुदिना फ्राइड राईस चवीला छान लागतो. मुलांना हा राईस फार आवडतो. ह्या राईसला पुदिन्याचा सुगंध येतो त्यामुळे तो चवीस्ट लागतो. तसेच पीर तळून घातल्यामुळे त्याची चव अजूनच छान लागते. मुलांना डब्यात द्यायला पण छान आहे.
The English language version of this Pulao dish is published here – Paneer Pudina Pulao
पनीर पुदिना राईस बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप बासमती तांदूळ
२०० ग्राम पनीर
२ टे स्पून तेल
मीठ चवीने
मसाला वाटण्या साठी:
२ कप पुदिना पाने(चिरून)
४-५ हिरव्या मिरच्या
१” आले तुकडा
८-१० लसूण पाकळ्या
फोडणीसाठी:
१ टे स्पून तेल
३ तमलपत्र
६-७ मिरे
४ लवंग
२ छोटे दालचीनी तुकडे
सजावटीसाठी: पुदिना पाने
कृती:
तांदूळ धुवून त्याचा मोकळा भात बनवून घ्या. कधी कधी आपला भात रहातो मग त्याचे काय करायचे हा प्रश्न पडतो. तेव्हा अश्या प्रकारचा बनवू शकतो.
पुदिना पाने, हिरव्या मिरच्या आले, लसूण व थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये पनीरचे तुकडे गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये तमलपत्र, मिरे, लवंग, दालचीनी घालून, पुदिन्याची वाटलेली पेस्ट घालून २-३ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये मीठ व शिजवलेला भात घालून ४-५ मिनिट परतून घ्या.
पुदिन्याचा भात परतून झाल्यावर तळलेले पनीर व पुदिन्याची पाने घालून सर्व्ह करा.