शाही महाराष्ट्रीयन मसाले भात: महाराष्ट्रात लग्न कार्यात अथवा सणावारी मसाले भात करतात. हा पारंपारिक पद्धतीने मसालेभात बनवलेला आहे. बघा तुम्हाला पण नक्की आवडेल. महाराष्ट्रात हा भात खूप लोकप्रिय आहे. ह्यामध्ये भाज्या आहेत त्यामुळे तो पौस्टिक आहे. बडीशेप मुळे त्याला छान सुगंध येतो.
The English language version of this Masale Bhat recipe is published here – Maharashtrian Style Masale Bhat
शाही महाराष्ट्रीयन मसाले भात: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप बासमती तांदूळ
२ कप भाज्या (३-४ मिनिट उकडून घ्या) (गाजर, फ्लॉवर, कोबी, शिमला मिर्च, फ्रेंच बीन्स, बटाटा व हिरवे मटार)
१ छोटे लिंबूरस
मीठ चवीने
मसाला हिरवा वाटून:
३/४ कप कोथंबीर
२ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून बडीशेप
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
लाल मसाला:
१ कप ओला नारळ खोवून
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गरम मसाला
१ छोटा टोमाटो (चिरून)
१५-२० पुदिना पाने
१ टी स्पून धने-जिरे पावडर
१/२ टे स्पून तेल
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१ छोटा कांदा (चिरून)
७-८ मिरे
२ तमलपत्र
३-४ हिरवे वेलदोडे
१/२ टी स्पून शहाजिरे
१/४ टी स्पून हळद
७-८ काजू
७-८ बदाम
२ टे स्पून किसमिस
कृती: तांदूळ धुवून बाजूला ठेवा. हिरवा मसाला वाटून घ्या.
लाल मसाल्यासाठी: मिक्सरच्या भांड्यात नारळ, लाल मिरची पावडर, धने=जिरे पावडर, गरम मसाला, व थोडे पाणी घालून थोडे जाडसर वाटून घ्या. एका कढईमध्ये तेल गरम करून वाटलेला मसाला घालून पाच मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये टोमाटो व पुदिना पाने घालून मिक्स करून घ्या.
प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमलपत्र, मिरे, हिरवे वेलदोडे, शहाजिरे, व कांदा घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये काजू, बदाम, किसमिस व धुतलेले तांदूळ घालून दोन मिनिट परतून घेऊन त्यामध्ये हिरवा मसाला घालून दोन मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये लाल परतलेला मसाला, उकडलेल्या भाज्या, मीठ, लिंबूरस, तूप घालून चार कप पाणी घाला मिक्स करून कुकरचे झाकण लावून दोन शिट्या काढा.
गरम गरम मसालेभाता वर कोथंबीर व नारळ घालून सजवा व सर्व्ह करा.