मसालेदार मलई कोळंबी रस्सा: कोलंबी म्हंटले की आपल्याला वेगवेगळ्या प्रकरचे रस्सा बनवता येतात. कोळंबीचा रस्सा हा कोकणातील फार लोकप्रिय आहे. अश्या प्रकारच्या रश्याबरोबर गरम गरम भात असले की झाले. ह्या रश्याची मजाच काही वेगळी आहे. कोळंबीचा रस्सा बनवतांना कोळंबी ताजी वापरावी तसेच रस्सा बनवतांना कांदा, आले, लसूण, खसखस, टोमाटो प्युरी, व नारळाची पेस्ट वापरली आहे. ओला नारळ वापरल्यामुळे ग्रेवीला चव उत्कृष्ट येते व घट्ट सुद्धा होते.
The English language version of the preparation method of this Prawns Curry caan be seen here – Spicy Cream Prawns Gravy
मसालेदार मलई कोळंबी रस्सा बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: २ जणासाठी
साहित्य:
२५० ग्राम कोळंबी
२ मोठे टोमाटो
१/२ कप दही
साखर व मीठ चवीने
१/२ कप ओला नारळ
२ टे स्पून कोथंबीर
१/२ टे स्पून खसखस
१/२ कप तेल
मसाल्यासाठी:
२ मोठे कांदे
७-८ लसूण पाकळ्या
१” आले
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून हळद,
१/२ टी स्पून गरम मसाला
कृती: कोळंबी साफ करून हळद व मीठ लावून ठेवावे. टोमाटो उकडून साले काढून प्युरी बनवा. खसखस भिजवून बारीक वाटून घ्या. ओला नारळ व दोन टे स्पून पाणी घालून मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्या. कांदा, आले-लसूण, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला बारीक वाटून घ्या.
कढईमधे तेल गरम करून कोळंबी गुलाबी रंगावर तळून घ्या व बाजूला ठेवा. त्याच कढईमधे कांद्याचा वाटलेला मसाला घालून ३-४ मिनिट परतून घेऊन टोमाटो प्युरी घालून परत ३-४ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये वाटलेली खसखस, वाटलेला नारळ, तळलेला कोळंबी, दही, १/२ कप पाणी, साखर व ,मीठ घालून कढईवर झाकण ठेवून ७-८ मिनिट मंद विस्तवावर कोळंबी शिजवून घ्या.
कोळंबी रस्सा कोथंबीरीने सजवा व गरम गरम जीरा राईस किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करा.