स्ट्रॉबेरी हलवा/ शिरा: स्ट्रॉबेरी म्हंटले की त्याचा मनमोहक लालबुंद रंग आपल्या डोळ्या समोर येतो. स्ट्रॉबेरी ही छान ज्युसी म्हणजेच रसरशीत असते. स्ट्रॉबेरी बघताच आपल्या तोंडाला पाणी सुटते. तिचा मधुर सुगंध व मधुर चव आपल्याला मोह पाडते. स्ट्रॉबेरीचे आइसक्रीम, ज्यूस, फ्रुट सलाड, शिरा व स्ट्रॉबेरीची पुरणपोळी सुद्धा बनवता येते. तसेच ती नुसती खायला सुद्धा छान आहे.
स्ट्रॉबेरीचे काही औषधी गुणधर्म आहेत. स्ट्रॉबेरीमध्ये व्हीटामीन “सी” भरपूर असते. त्यामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढते. स्ट्रॉबेरीच्या सेवनाने हृद्यरोग व मधुमेह होण्याचा संभव टळतो.
स्ट्रॉबेरीचा शिरा अथवा हलवा चवीला छान लागतो. बनवायला खूप सोपा व लवकर होणारा आहे. सणावारी करायला पण छान आहे. दिसायला पण खूप आकर्षक दिसतो.
The English language version of this Sheera preparation method can bee seen here – Strawberry Sheera
स्ट्रॉबेरी शिरा बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप रवा
१/४ कप स्ट्रॉबेरी पल्प
३/४ कप साखर
२ कप दुध
२ टे स्पून साजूक तूप
१ टी स्पून वेलचीपूड
ड्रायफ्रुट सजवण्यासाठी
कृती:
एका कढईमधे १ टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये रवा मिक्स करून घ्या. मंद विस्तवावर रवा गुलाबी रंगावर भाजून घ्या. रवा भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या.
कढईमधे दुध गरम करून एक उकळी आणा मग त्यामध्ये भाजलेला रवा घालून मिक्स करून २-३ मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या.
रवा शिजल्यावर त्यामध्ये साखर, स्ट्रॉबेरी पल्प, वेलचीपूड घालून मिक्स करून घ्या. मग २-३ मिनिट शिजवून घ्या.
ड्रायफ्रुटने सजवुन गरम गरम शिरा सर्व्ह करा.