बटाट्याच्या पुरण पोळ्या: आपण बटाट्याचे पराठे बनवतो. बटाट्याच्या पुरणाच्या पोळ्या आपण सणावाराला बनवू शकतो. बटाट्याच्या पुरणाच्या पोळ्या चवीला फार छान लागतात. ह्यामध्ये बटाटे उकडून किसून घेवून तुपामध्ये भाजून घेवून त्यामध्ये खवा वापरला आहे त्यामुळे वेगळीच चव लागते.
The English language version of this Puran Poli preparation method can be seen here- Potato Puran Poli
बटाट्याच्या पुरण पोळ्या बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ पोळ्या बनतात
साहित्य : सारणासाठी:
2 मोठे बटाटे
१/4 वाटी खवा
१/4 वाटी साखर
2 टे स्पून तूप
1 टे स्पून दुध
२-३ काड्या केसर
१ टी स्पून वेलचीपूड
थोडे मनुके बारीक तुकडे करून
काजू-बदाम बारीक कुटून
आवरणासाठी:
२ कप गव्हाचे पीठ
२ टे स्पून मैदा
१ टे स्पून तेल (गरम)
मीठ चवीने
दुध पीठ भिजवण्यासाठी
कृती : सारणासाठी:
बटाटे उकडून, साले काढून, कुस्करून घ्या. कढई मध्ये तूप गरम करून बटाटे खमंग भाजून घ्या. नंतर त्यामध्ये खवा घालून १-२ मिनिट भाजून घ्या. दुध घालून १-२ मिनिट भाजून घ्या. नंतर साखर, वेलचीपूड, केसर घालून मंद विस्तवावर थोडावेळ ठेवून मोकळा झाला की उतरवावा. सारणाचे एक सारखे चार भाग करा.
भिजवलेल्या पीठाचे एक सारखे आठ गोळे बनवून घ्या. दोन गोळे घेवून पुरी सारखे लाटून त्यामध्ये सारणाचा एक भाग ठेवून त्यावर दुसरी पुरी ठेवून कडा दाबून घेवून थोडी लाटून घ्या.
नॉन स्टिक तवा गरम करून घेवून पोळी भाजून घ्या. पोळी सर्व्ह करतांना वरतून तूप लावा व मग सर्व्ह करा.