चॉकलेट कॉफी मलई कुल्फी: चॉकलेट कॉफी मलई कुल्फी खूप टेस्टी लागते. उन्हाळा चालू झालाकी लहान मुलांना सारखे काही तरी थंड पाहिजे असते. आपण वेगवेगळे फळांचे जूस, वेगवेगळी आईसक्रिम बनवतो. चॉकलेट कॉफी मलई कुल्फी बनवून बघा मुलांना नक्की आवडेल. हे कुल्की बनवायला अगदी सोपी आहे ती बनवतांना कोको पावडर व नेसकॅफे वापरली आहे. खवा व मिल्क पावडर घातल्यामुळे छान मुलायम होते. क्रिस्टल आजीबात होत नाहीत व खूप टेस्टी बनते. जायफळ पावडर वापरली आहे त्यामुळे सुगंध छान येतो.
The English language version of this Ice Cream preparation method can be seen here – Homemade Chocolate Ice Cream
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
डीपफ्रीजमध्ये ठेवण्यासाठी वेळ: ४-५ तास
वाढणी: ५-६ जणासाठी
साहित्य:
३ कप दुध (म्हशीचे)
१ कप खवा
१ कप मिल्क पावडर
१ कप फ्रेश क्रीम
१ कप साखर
१ टे स्पून कोको पावडर
१/४ टी स्पून नेसकॉफी
१/४ टी स्पून जायफळ पावडर
१/२ टी स्पून वेलचीपूड
चॉकलेट सॉस सजावटीसाठी
कृती:
दुध व साखर मिक्स करून १०-१२ मिनिट मंद विस्तवावर आटवून घेवून थंड करायला ठेवावे.
खवा, फ्रेश क्रीम, कोको पावर, नेसकॉफी, जायफळ पावडर, वेलची पूड व आटवलेले थोडे दुध एक मिनिट ब्लेंड करून घ्यावे. मग त्यामध्ये बाकीचे आटवलेले दुध घालून परत एक मिनिट ब्लेंड करून घ्यावे.
एका अलुमिनियमच्या भांड्यात मिश्रण ओतून त्यावर झाकण ठेवून डीप फ्रीजमध्ये ४-५ तास ठेवावे.
कुल्फी सेट झाल्यावर वरतून चॉकलेट सॉसने सजवून सर्व्ह करावे.