चॉकलेट चुरमुरे बार: चुरमुरे लहान मुलांना खूप आवडतात. चुरमुरे वापरून आपण भेळ किंवा चिवडा बनवतो. ह्याचे चॉकलेट बार पण फार चवीस्ट लागतात व दिसायला पण छान दिसतात. तसेच बनवायला पण सोपे व लवकर बनतात. चुरमुरे हे पौस्टिक पण आहेत.
The English language version of the same recipe can be seen here – Puffed Rice Chocolate
चॉकलेट चुरमुरे बार बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: १२ बार बनतात
साहित्य:
४ कप चुरमुरे (मुरमुरे)
१ कप गुळ
१/४ कप पाणी
१ टे स्पून साजूक तूप
१/२ टी स्पून वेलचीपूड
१ टे स्पून चॉकलेट सॉस
(किंवा एक डेअरी मिल्क चॉकलेट बार मेल्ट करून)
१ टी स्पून तूप प्लेटला लावायला
कृती:
एका कढईमध्ये गुळ व तूप मिक्स करून घट्ट गोळी पाक करून घ्या. (पाक तयार झाला की ते बघण्यासाठी एका वाटीत थोडे पाणी घेवून त्यामध्ये पाकाचे २-३ थेंब टाका पाण्यात टाकल्या टाकल्या पाकाची गोळी झाली असे दिसले की पा तयार झाला असे समजावे.) मग त्यामध्ये वेलचीपूड व मुरमुरे घालून मिक्स करा.
एका स्टीलच्या प्लेटला तूप लावून मिश्रण प्लेटमध्ये ओता व एक सारखे थापून घ्या. गरम असतांनाच त्याच्या आयता कृती आकाराच्या वड्या पाडा.
सर्व्ह करतांना वरतून चॉकलेट सॉस ने सजवून मग सर्व्ह करा.