काजू मटर ग्रेव्ही: काजू मटर ग्रेव्ही ही अगदी हॉटेलमध्ये बनवतात तशी बनते. ही डीश घरी पार्टीसाठी बनवायला छान आहे. काजू मटर ग्रेव्ही बनवण्यासाठी ओला नारळ वापरला आहे त्यामुळे चव छान येते. काजू मटर ग्रेव्ही ही चपाती बरोबर किंवा पराठ्या बरोबर छान लागते.
The English language version of this gravy recipe can be seen here – Kaju Matar Gravy
काजू मटर ग्रेव्ही बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
१ कप काजूचे तुकडे (आखे काजू दोन भाग करून)
एक कप हिरवे ताजे मटार दाणे
१ टी स्पून साखर
मसाल्यासाठी:
१/२ कप ओला नारळ (खोवून)
१/२ कप कोथंबीर (चिरून)
५ हिरव्या मिरच्या
६ लसूण पाकळ्या
२ मोठे हिरवे टोमाटो
फोडणीसाठी:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
मीठ चवीने
कृती:
हिरवे मटारचे दाणे उकडून घ्या. काजूचे तुकडे एक तास पाण्यात भिजत घाला.
मिक्सरमध्ये ओला खोवलेला नारळ, कोथंबीर, हिरवी मिरची, लसूण, हिरवे टोमाटो बारीक वाटून घ्या.
एका कढई मध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग घालून वाटलेला हिरवा मसाला घालून मंद विस्तवावर कोरडा होई परंत भाजून घ्या.
मसाला भाजून झाल्यावर शिजवलेले हिरवे मटार दाणे, भिजवलेले काजू, मीठ, साखर, १/२ कप पाणी घालून मिक्स करून पाच मिनिट मंद वास्तवावर शिजवून घ्या.
काजू मटर ग्रेव्ही चपाती बरोबर किंवा पराठ्या बरोबर सर्व्ह करा.