महाराष्ट्रीयन स्टाईल फ्राईड चिकन: हा चिकनचा प्रकार पार्टीला स्टारटर म्हणून किंवा जेवणात साईड डीश म्हणून करता येईल. फ्राईड चिकन बनवायला फार सोपे आहे. चवीला चटपटीत व छान खमंग लागते. मसाला लावून अर्धा तास ठेवल्यामुळे ते चांगले मुरते. कॉर्नफ्लोर व तांदळाचे पीठ लावून तळल्यामुळे छान क्रिस्पी लागते.
The English language version of the same Fried Chicken dish can be seen here- Crispy and Tasty Fried Chicken
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
मसाला लावून ठेवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१६ बोनलेस चिकनचे तुकडे
२ टे स्पून आले-लसूण पेस्ट
२ टे स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर
१ टे स्पून हळद
१ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून काळी मिरी पावडर
१/४ कप दही
१०-१२ कडीपत्ता पाने (चिरून)
मीठ चवीने
१/२ कप तेल
आवरणासाठी:
२ टे स्पून कॉर्नफ्लोर २ टे स्पून तांदळाचे पीठ किंवा मैदा
खमंगपणा येण्यासाठी:
तेल
१ टी स्पून आले-लसूण पेस्ट
१ टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर
१ टे स्पून दही
७-८ कडीपत्ता पाने (चिरून)
१/४ टी स्पून काळी मिरी पावडर
साखर व मीठ चवीने
कृती: Marinate करण्यासाठी:
चिकनचे तुकडे, कश्मीरी पावडर, हळद, गरम मसाला, दही, आले-लसूण पेस्ट, मिरे पावडर, मीठ, कडीपत्ता घालून मिक्स करून ३० मिनिट फ्रीजमध्ये ठेवून द्या. मग त्यामध्ये कॉर्नफ्लोर, मैदा किंवा तांदळाचे पीठ घालून चिकनच्या तुकड्यांना लावा.
कढईमधे तेल गरम करून चिकनचे गुलाबी रंगावर तळून घ्या. तळलेले चिकनचे पीसेस टिशू पेपर वर ठेवा म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईन.
कढईमधील तेल गाळून घ्या व त्यातील एक टी स्पून तेल गरम करून त्यामध्ये एक टी स्पून आले-लसूण पेस्ट, चिरलेले कडीपत्ता, कश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, दही, मीठ, साखर, घालून २-३ मिनिट फ्राय करून घ्या. मग त्यामध्ये तळलेले चिकनचे तुकडे घालून परत २-३ मिनिट परतून घ्या.
गरम गरम सर्व्ह करा. सर्व्ह करतांना वरतून कांदा, कोथंबीर व लिंबूने सजवा.