कोंकणी चिकन खिमा मसाला: कोंकणी खिमा मसाला हा मुख्य जेवणातील पदार्थ आहे. खिमा म्हंटले की आपण बरेच वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. चिकन खिमा हा छान खमंग लागतो व बनवतांना खडा मसाला घेवून भाजून वाटलेला आहे त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते.
The English language version of this Kheema Masala dish can be seen here – Spicy Konkani Kheema Masala
कोंकणी चिकन खिमा मसाला बनवण्यासाठी वेळ: ४५
मिनिट वाढणी: ५-६ जणासाठी
साहित्य:
१ किलो चिकन खिमा
४ मोठे कांदे
२ मोठे टोमाटो
२” आले
१२ लसूण पाकळ्या
५ हिरव्या मिरच्या
मसाल्यासाठी:
२ टे स्पून सुके खोबरे
५ लवंगा
३ दालचीनी तुकडे
६ काळे मिरे
७ सुक्या लाल मिरच्या
१ टे स्पून खस खस
१ टे स्पून बडीशेप
१ टे स्पून तीळ
२ मसाले वेलदोडा
१/२ कप तेल
१ टी स्पून हळद
१/२ कप दही
२ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
१/२ कप कोथंबीर (चिरून)
कृती:
खिमा धुवून चाळणीवर निथळत ठेवा. आले-लसूण-हिरवी मिरची वाटून घ्या.
कढईमधे एक टी स्पून तेल गरम करून त्यामध्ये सुके खोबरे, लवंग, दालचीनी, काळे मिरे, सुकी लाल मिरची, खसखस, बडीशेप, तीळ, मसाला वेलदोडे, घालून दोन मिनिट परतून घेवून मग वाटून घ्या.
निथळत ठेवलेल्या खिम्यामध्ये अर्धे वाटलेले आले-लसूण पेस्ट, दही, १/४ टी स्पून हळद, २ टी स्पून लाल मिरची पावडर, १/२ टी स्पून गरम मसाला घालून मिक्स करून अर्धा तास बाजूला झाकून ठेवा.
एक टे स्पून तेल कढईमधे गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर भाजून घ्या. मग त्यामध्ये वाटलेला गरम मसाला घालून तेल सुटे परंत भाजून घ्या. मग त्यामध्ये राहिलेली आले-लसूण पेस्ट. खिमा घालून दहा मिनिट मंद विस्तवावर भाजून घेवून चिरलेले टोमाटो, मीठ, व दोन कप पाणी घालून मिक्स करून खिमा शिजवून घ्या. कोथंबीर घालून गरम गरम खिमा चपाती अथवा पराठा बरोबर सर्व्ह करा.
अश्या पद्धतीने बनवलेल्या खिम्याचे सामोसा, रोल किंवा पराठा बनवता येतात पण रोल किंवा पराठा बनवतांना खिमा कोरडा करावा म्हणजे खिमा रोल, खिमा सामोसा किंवा पराठा मऊ पडणार नाही.