पनीर मटार बॉल करी: पनीर मटार बॉल करी ही खूप टेस्टी लागते. घरी आपण पार्टीला किंवा इतर दिवशी पण बनवू शकतो. ही ग्रेवी बनवतांना होममेड पनीर बनवून त्यामध्ये मटर व खव्याचे सारण भरले आहे. त्यामुळे पनीर व खवा हे कॉमबीनेशन खूप छान लागते.
The English language version of the preparation method of this Paneer Gravy is published here – Paneer Green Peas Ball Curry
पनीर मटार बॉल करी बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य: रसगुल्ले बनवण्यासाठी:
१ लिटर दुध (गाईचे)
१/८ टी स्पून सायट्रिक असिड
एक चिमुट बेकिंग पावडर
सारणासाठी :
१/४ कप ताजे मटरचे दाणे
१ टे स्पून खवा
४ पिस्ते
४ बदाम
२ हिरवे वेलदोडे
करीसाठी:
२ मोठे कांदे (चिरून)
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
१ टी स्पून जिरे पावडर
२ मोठे टोमाटो
२ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ कप फ्रेश क्रीम
मीठ चवीने
कोथंबीर (चिरून)
तूप पनीर बॉल तळण्यासाठी
कृती: टोमाटो उकडून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या.
रसगुल्ले तयार करण्यासाठी: गाईचे दुध गरम करून त्यामध्ये सायट्रिक असिड मिक्स करून दोन मिनिट दुध उकळून घ्यावे मग दुधाचा रंग बदलला की दुध खाली उतरवा. एका चाळणीवर पातळ कपडा घालून दुध चाळणीवर ओता व त्यावर दोन ग्लास थंड पाणी घाला. मग छाना मधील पाणी काढून घेवून मिक्सरमध्ये छाना व एक चिमुट बेकीग पावडर घालून दोन सेकंद ग्राईड करून घ्या. मिक्सर मधून छाना काढून एका प्लेटमध्ये काढून घ्या. चांगला मळून त्याचे एका सारखे १६ गोळे बनवावेत.
सारणासाठी: मटारचे दाणे पाच मिनिट उकडून घेवून थोडे ठेचून घ्या. मग त्यामध्ये १ टे स्पून छाना, खवा, पिस्त्याचे तुकडे, बदाम तुकडे, वेलदोडे पूड घालून मिक्स करून सारण बनवून घ्या.
छानाचे गोळे घेवून त्यामध्ये मटारचे सारण भरून गोळे बंद करा.
एका कढईमधे तूप गरम करून बनवलेले पनीरचे गोळे गुलाबी रंगावर तळून घ्या.
करीसाठी: कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा २-३ मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या मग त्यामध्ये आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, जिरे, मीठ व टोमाटो प्युरी घालून मंद विस्तवावर ५ मिनिट भाजून घ्या. एक कप कोमट पाणी घालून ५-७ मिनिट मंद विस्तवावर उकळी येवू द्या.मग त्यामध्ये साखर व फ्रेश क्रीम घालून मिक्स करून पनीर बॉल घालून पराठ्या बरोबर सर्व्ह करा.