रस घावन: रस घावन हा महाराष्ट्रातील कोकण ह्या भागामध्ये लोकप्रिय आहे. कोकणामध्ये होळीच्या दिवशी पुरणपोळी अथवा रस घावन अगदी आवर्जून बनवतात. घावन हे तांदळाच्या पिठापासून बनवतात तर रस हा नारळाचे घट्ट दुध काढून त्यामध्ये गुळ व वेलचीपूड घालून बनवतात. सर्व्ह करताना नारळाच्या रसात घावन बुडवून द्यायची पद्धत आहे. रस घावन हे चवीला अप्रतीम लागतात. रस घावन हे जेवणात किंवा नाश्त्याला सुद्धा बनवता येतात. तसेच सणावाराला सुद्धा बनवतात येतात.
The English language of the preparation method on this recipe is published here – Ras Ghavan
रस घावन बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ८ डोसे बनतात
साहित्य: रस बनवण्यासाठी :
३ कप नारळाचे दुध
१ टे स्पून गुळ
१ टे स्पून साखर
१ टी स्पून वेलचीपूड
घावन बनवण्यासाठी:
२ कप तांदळाचे पीठ (आंबेमोहर तांदळाचे)
१ टी स्पून मैदा
मीठ चवीने
तेल घावन बनवण्यासाठी
कृती: रस बनवण्यासाठी: नारळाचे दुध काढून घ्या. म्ह त्यामध्ये किसलेला गुळ, साखर, वेलचीपूड घालून मिक्स करा.
घावन बनवण्यासाठी: तांदळाचे पीठ, मैदा, मीठ घालून पीठ डोश्या सारखे भिजवून घ्या.
नॉन स्टिक तवा तापवून त्यावर पातळ डोसे बनवून घ्या मग कडेनी थोडेसे तेल घालून तव्यावर झाकण ठेवा. दोन मिनिटांत झाकण कडून डोसा उलट करून अर्धा मिनिट तव्यावर ठेवून काढा. असे सर्व डोसे बनवून घ्या.
सर्व्ह करतांना रस व घावन वेगवेगळे ठेवून किंवा मिक्स करून द्या.