खव्याची कारंजी: खव्याची करंजी ही दिवाळीच्या फराळात किंवा इतर सणावाराला बनवू शकतो. आपण खव्याचे सारण वापरून करंजी, सामोसा, काही बनवू शकतो. मी एक वेगळ्या प्रकारचा आकार बनवला आहे, हा आकार दिसायला पण छान दिसतो व मुलांना पण खूप आवडेल. सारण बनवतांना खवा व ड्रायफ्रुट वापरले आहेत त्यामुळे ही कारंजी अगदी शाही बनते व चवीला पण छान लागते. कारंजी किंवा सामोसा बनवून झाल्यावर वरतून थोडा साखरेचा पाक घातला आहे त्यामुळे चव पण सुंदर लागते.
The Marathi language version of this Khoya Dish preparation method can be seen here- Khoya Karanji-Modak- Samosa
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २० बनतात
साहित्य: आवरणासाठी:
२ कप मैदा
१ कप गव्हाचे पीठ
२ टे स्पून तूप (गरम)
मीठ चवीने
सारणासाठी:
१ कप खवा
२ टे स्पून चरोळी
८ बदाम
१० काजू
५ पिस्ता
१५ किसमिस
५ जरदाळू
१/२ कप आक्रोड
१/२ कप पिठीसाखर
१ टी स्पून वेलचीपूड
१/४ टी स्पून जायफळ पूड
पाक तयार करण्यासाठी:
२ कप साखर
१/२ कप पाणी
३ थेंब रोझ इसेन्स
वनस्पती तूप कारंजी तळण्यासाठी
कृती:
आवरणासाठी: मैदा, गव्हाचे पीठ, मीठ, गरम तूप मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये पाणी मिक्स करून घट्ट पीठ मळून घ्या. अर्ध्या तासांनी मिक्सरमध्ये भिजवलेले पीठ थोडेसे ग्राईड करून घेवून त्याचे एक सारखे २० गोळे बनवा.
सारणासाठी: कढईमधे थोडेसे तूप गरम करून काजू, बदाम टाळून घेवून त्याचे तुकडे करून घ्या. अक्रोड, पिस्ता व जर्दाळूचे पण तुकडे करून घ्या. मग त्याच कढईमधे खवा थोडासा परतून घ्या. सारण बनवण्यासाठी भाजलेला खवा, पिठीसाखर, ड्रायफ्रुट, वेलचीपूड, जायफळ पूड मिक्स करून घ्या.
कारंजी बनवण्यासाठी एक गोळा पुरी सारखा लाटून त्यामध्ये १ टे स्पून सारण भरून मुडपून घ्या व त्याला छान आकार द्या, अश्या सर्व करंज्या बनवून घ्या.
साखरेचा पाक: साखर व पाणी मिक्स करून थोडासा घट्ट पाक करायला ठेवा. थंड झाल्यावर त्यामध्ये रोझ इसेन्स मिक्स करा.
कढईमधे तूप गरम करून करंज्या छान गुलाबी रंगावर तळून घ्या. करंज्या तळून झाल्यावर कारंजवर थोडा थोडा साखरेचा पाक घालून ५-१० मिनिटानी मग सर्व्ह करा.