तांदळाचे वडे: तांदळाचे वडे हे मटणाच्या रशा बरोबर सर्व्ह करावेत. तांदळाचे वडे हे कोकणामध्ये बनवण्याची पद्धत आहे. कोकणामध्ये मटणाच्या रशा बरोबर तांदळाची भाकरी किवा चपाती आयवजी तांदळाचे वडे सर्व्ह करतात. त्यासाठी मटणाचा किंवा चिकनचा रस्सा चांगला झणझणीत बनवतात. त्यासाठी त्याचे पीठ वेगळे बनवतात. तसेच कोकणामध्ये श्राद्धाच्या दिवशीपण हे वडे बनवण्याची प्रथा आहे.
बनवण्या साठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ३०-३५ तांदळाचे वडे
साहित्य:
२ कप साधे तांदूळ
१ कप हरभरा डाळ
१/२ कप उडीदडाळ
१/२ टे स्पून धने
१/२ टे स्पून जिरे
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून हळद
मीठ चवीने
१/४ कप कोथंबीर
तेल तांदळाचे वडे तळण्यासाठी
कृती:
तांदूळ धुवून घ्या मग सावलीमध्ये सुकवून घ्या. डाळी धुवायच्या नाहीत. मग तांदूळ, डाळी दळून आणा पण दळताना जरा जाडसर दळून घ्या.
तांदळाचे वडे बनवतांना दोन कप तांदळाचे दळलेले पीठ घेवून त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ, धने-जिरे पावडर, मीठ व १ टे स्पून गरम तेल, कोथंबीर घालून मग पीठ भिजवून दोन तास बाजूला ठेवावे.
मग पीठाचे एक सारखे १२ गोळे बनवावे. कढई मध्ये तेल गरम करून घ्या. एक एक गोळा घेवून प्लास्टिकच्या पेपरवर पुरीच्या आकाराचा थापून घेवून मंद विस्तवावर वडे तळून घ्यावेत. हे वडे फार चवीस्ट लागतात.