खमंग भरलेली वांगी: भरलेली वांगी ही महाराष्ट्र मधील लोकप्रिय डिश आहे. ह्यालाच मसाला वांगी सुद्धा म्हणतात. भरलेली वांगी ही ज्वारीच्या, बाजरीच्या अथवा तांदळाच्या भाकरी बरोबर फार छान लागतात. भरली वांगी बनवायला सोपी आहेत, ह्या पद्धतीने बनवलेली वांगी खमंग लागतात. ह्यामध्ये तीळ, शेगदाणे व खोबरे वापरले आहे त्यामुळे ह्याची चव खमंग लागते.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
८ छोटी काटेरी वांगी
२ मध्यम आकाराचे कांदे (चिरून)
१ मध्यम आकाराचा टोमाटो (चिरून)
मीठ चवीनुसार
मसाल्यासाठी:
५-६ लसून पाकळ्या
१/२” आले तुकडा
१/२ कप ओला नारळा (खोवून)
२ टे स्पून तीळ
१/४ कप शेंगदाणे (भाजून, सोलून)
१/४ कप सुके खोबरे
१/२ कप कोथंबीर (चिरून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
फोडणी साठी:
२ टे स्पून तेल,
१/४ टी स्पून हिंग,
१/२ टी स्पून हळद
कृती:
मसाल्या साठी: लसून, आले, तीळ, शेगदाणे, सुके खोबरे, कोथंबीर, लाल मिरची पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला हे सर्व मिक्सरमध्ये २ टे स्पून पाणी घालून जाडसर वाटून घ्यावे.
वांगी धुवून पुसून घेवून त्याचे देठ कापून घ्या. वांग्याच्या वरच्या बाजूस तीन उभे चीर मारून त्यामध्ये एक टे स्पून वाटलेला मसाला भरून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये हिंग, हळद, कांदा, टोमाटो घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. त्यामध्ये मसाला भरलेली वांगी व राहिलेला मसाला घालून मंद विस्तवावर भाजून घ्या. मग त्यामध्ये एक कप पाणी घालून कढईवर झाकण ठेवून द्या. झाकणावर थोडे पाणी घालून मंद विस्तवावर वांगी शिजू द्या.
गरम गरम भरलेली वांगी भाकरी किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा.