कोकणी भेंडीची भाजी: कोकणी भेंडीची भाजी ही चवीला स्वदिस्त लागते. भेंडीची भाजी लवकर होणारी व सर्वांना आवडणारी आहे. भेंडीची भाजी हे लहान मुले आवडीने खातात, कांदा व आमसूल घालून घालून ही भाजी रुचकर लागते. ही भेंडीची भाजी मुलांना डब्यात द्यायला छान आहे.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
पाव किलो कवळी भेंडी
१ मोठा कांदा (उभा चिरून)
२ आमसूल
२ टे स्पून ओले खोबरे (खोवून)
२ टे स्पून कोथंबीर (चिरून)
मीठ चवीने
फोडणीसाठी:
२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
७-८ कडीपत्ता पाने
१/२ टी स्पून हळद
१ टी स्पून लाल मिरची
१ टी स्पून धने-जिरे पूड
कृती: भेंडीची भाजी धुवून पुसून घ्या. मग भेंडीचे देठ काढून गोल गोल चकत्या करा.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता, हळद, मीठ ,कांदा घालून लगेच चिरलेली भेंडी घालून मिक्स करून भाजी चांगली परतून घ्यावी.
भाजी शिजल्यावर त्यामध्ये लाल मिरची पावडर, धने जिरे पावडर, आमसूल, कोथंबीर, खोबरे व थोडीशी साखर घालून मिक्स करून भाजी थोडी परतून घ्यावी.
गरम गरम भाजी चपाती बरोबर सर्व्ह करावी.