Madhur Ambyacha Ras Recipe in Marathi

Aamras
Madhur Ambyacha Ras

मधुर आंब्याचा रस: आंबा हा फळांचा राजा आहे. आंबा हे फळ चवीला गोड व मधुर आहे. आंब्याचा रस सेवन केल्याने आपल्या रक्तातील हिमोग्लोबीन व लाल कण वाढतात व आतड्यासाठी उत्तम आहे. तसेच आंब्याच्या रसाच्या सेवनाने आपली शरीराची कांती सुंदर व तेजस्वी बनते. अंबाहा पौस्टिक आहे. आंब्याचा रस बनवून चपाती किंवा पुरी बरोबर सर्व्ह करावा. आंब्याच्या रसात जीवनसत्व “ए “ व “सी” पुष्कळ प्रमाणात असेत. जीवनसत्व “ए” हे जंतुनाशक असते तर जीवनसत्व “सी” त्वचारोगहारक असते.
आमरस बनवताना महाराष्टात वेलचीपूड मिक्स करतात त्याने आमरसाचा सुगंध अजून वाढतो व टेस्ट सुंदर लागते. गुजरातमध्ये आंब्याच्या रसात आल्याची पावडर मिक्स करतात त्याने टेस्ट अजून छान येते. तसेच राजस्तानमध्ये आंब्याच्या रसात केशर मिक्स करतात त्यामुळे पण टेस्ट चांगली लागते.

आमरस बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
६ गोड हापूस आंबे (Alphonso Mangoes)
१/२ टी स्पून वेलची पूड (Cardamom)
१/४ टी स्पून केशर (Saffron)
साखर चवीने
१/४ कप दुध

Aamras
Madhur Ambyacha Ras

कृती: आंबे धुवून त्याची साले काढून लहान लहान फोडी कराव्यात. मग आंब्याच्या फोडी, साखर, वेलचीपूड, केशर घालून मिक्सरमध्ये अर्धा मिनिट फिरवून घ्यावे. मग चपाती बरोबर किंवा पुरी बरोबर सर्व्ह करावे.

टीप: आंब्याचा रस बनवतांना हापूस आंबे किंवा केशर आंबा वापरावा.
आमरस बनवण्या आगोदर आंबा अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवावा. कारण आंबा उष्ण असतो पाण्यात भिजत ठेवल्यामुळे त्याचातील गरमी कमी होते व पचायला हलका होतो.
आंब्याचा रस फार आधी बनवून ठेऊ नये कारण त्याचा रंग बदलतो.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.