पालकचे सूप: पालकचे सूप खूप टेस्टी लागते. पालक हा आपल्या आरोग्याला हितकारक आहे हे आपल्याला माहीत आहेच. हे सूप अगदी हॉटेलमध्ये बनवतात तसे बनते. पालक सूप बनवतांना पालकची पाने कोवळी घ्यावीत. पालक उकडल्यावर पेस्ट करतांना दुध मिक्स करत पालक वाटावे म्हणजे अगदी एकजीव होते व रंग पण छान येतो. चीज घातल्याने त्याची टेस्ट पण छान येते.
साहित्य:
१ पालक जुडी
१ दलचीनीचा तुकडा
२ कप दुध
१ चीज क्यूब
मीठ व मिरीपूड चवीने
कृती:
पालकची निवडून धुवून उकडून घ्या व थंड झाल्यावर त्याची पेस्ट करून घ्या. पेस्ट करतांना थोडे थोडे दुध घालून बारीक वाटून घ्या.
एका जाड बुडाच्या भांड्यात पालकची पेस्ट काढून त्यामध्ये दालचीनी पावडर, मीठ, मिरे पावडर घालून मिक्स करून एक चांगली उकळी आणा.
गरम गरम सर्व्ह करा. सर्व्ह करतांना चीज किसून घाला