तांबड्या भोपळ्याचे सूप: तांबड्या भोपळ्याचे सूप हे चवीस्ट लागते व दिसायला पण छान दिसते. तांबडा भोपळा हा लाभदायक व पीतशामक आहे. नाजूक प्रकृतीच्या व उष्ण प्रकृतीच्या लोकांसाठी आरोग्य दायक आहे. भोपळा शीतल, रुचीवर्धक, मधुर, व बलदायक आहे. तांबड्या भोपळ्याच्या सेवनाने झोप पण चांगली येते.
The English language version of the preparation method of this Pumpkin Soup is published here- Healthy and Nutritious Pumpkin Soup
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
३ कप व्हेजीटेबल स्टॉक
१ छोटा कांदा (चिरून)
१ किलो ग्राम तांबडा भोपळा
४ टे स्पून कोथंबीर (चिरून)
४ टे स्पून फ्रेश क्रीम
१ टे स्पून बटर
मिरे पावडर व मीठ चवीने
कृती:
कांदा बारीक चिरून घ्या. तांबडा भोपळ्याची साले व बिया काढून त्याचे तुकडे करून घ्या. कोथंबीर चिरून घ्या. क्रीम फेटून घ्या.
एका जाड बुडाच्या भांड्यात बटर गरम करून त्यामध्ये कांदा गुलाबी रंगावर मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये तांबड्या भोपळ्याच्या फोडी व व्हेजीटेबल स्टॉक घालून १० मिनिट मंद विस्तवावर झाकण ठेवून शिजू द्या.
थंड झाल्यावर मिक्सरमध्ये शीजेलेला भोपळा, मीठ व मिरे पावडर घालून बारीक पेस्ट करून घ्या.
सर्व्ह करतांना वरतून क्रीम, कोथंबीर व मिरे पावडर घालून सर्व्ह करा.