केशर गोड दही: केशर गोड दही हे बनवण्यासाठी फार सोपे आहे. केसर दही चवीला फार छान आहे. दही हे आरोग्यासाठी लाभदायक आहे. केसर दही बनवतांना त्यामध्ये मिल्क पावडर वापरली आहे त्यामुळे दह्याला घट्ट पणा येतो. केसर घातल्या मुळे त्याची चव छान लागते. वेलचीपूड वापरल्यामुळे सुंगध पण छान येतो. अश्या प्रकारचे दही घरी पार्टीला बनवायला चांगले आहे.
The Marathi language version of the preparation method of this sweet curds recipe can be seen here – Healthy Saffron Dahi
बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
२ कप दुध
२ टी स्पून मिल्क पावडर
१ १/२ टी स्पून ताजे दही
४ टी स्पून साखर
२ चिमुट वेलचीपूड
२ चिमुट केसर (Saffron)
कृती: दुध गरम करून कोमट करून घ्या. मग त्यामध्ये मिल्क पावडर, दही, वेलचीपूड, साखर व केसरचे दुध घालून मिक्स करून दही सेट करायला ठेवा.
दही सेट झाल्यावर फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर सर्व्ह करा.