आमरस पुरी: आमरस पुरी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय डीश आहे. आमरस ह्याचा अर्थ असा की आम म्हणजे आंब्याचा रस म्हणजे आंब्याचा ज्यूस. आमरस पुरी ही एक शाही डीश आहे. आमरस पुरी ही लग्न कार्यात किंवा सणाच्या दिवशी बनवतात. आंब्याचा सुगंध तर छान असतोच पण त्यामध्ये वेलचीपूड व केसर घातल्यामुळे आमरसाची चव अजून छान लागते. साखर थोडी चवीला घातल्याने अजून छान गोडी येते.
आमरस बनवतांना शक्यतो हापूस आंबा वापरावा कारण त्याचा रस छान घट्ट होतो व त्याचा रंग सुद्धा छान येतो.
The English language of the Maharashtrian Mango Sweet dish is published here – Authentic Maharashtrian Aamras Puri
आमरस बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
पुरी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
आमरस बनवण्यासाठी
६ हापूस आंबे
१/२ टी स्पून वेलचीपूड
१/४ टी स्पून केसर
१/४ कप दुध
साखर चवीने
पुरी बनवण्यासाठी
३ कप गव्हाचे पीठ
२ टे स्पून तेल
१ टी स्पून साखर
मीठ चवीने
कृती:
आमरस बनवण्यासाठी: आंबे धुवून घेवून त्याची साले काढून लहान फोडी कराव्यात. आंब्याच्या फोडी, वेलचीपूड, केसर, दुध व साखर ब्लेंडरने ब्लेंड करावी. मग फ्रीझमध्ये थंड करायला ठेवावे.
पुरी बनवण्यासाठी: गव्हाचे पीठ, मीठ, साखर व गरम तेल मिक्स करून थोडेसे पाणी वापरून पुरीचे घट्ट पीठ मळून १० मिनिट बाजूला ठेवावे. पीठ मुरले म्हणजे पुऱ्या छान फुलतात. पुरीच्या पीठाचे एक सारखे २० गोळे बनवावे. एक एक गोळा घेवून पुरीच्या आकाराचा लाटावा.
कढईमधे तेल गरम करून पुऱ्या छान गुलाबी रंगावर तळून घ्याव्यात.
गरम गरम पुरी व आमरस सर्व्ह करावा.