दही वडा: दही वडा ही एक जेवणा नंतर सर्व्ह करायची डीश आहे. ह्याला डेझर्ट म्हणायला हरकत नाही. खरम्हणजे दही वडा ही डीश उत्तर हिन्दुस्तान मधील लोकप्रिय डीश आहे. पण आता भारतभर ही डीश आवडीने बनवले जाते. दही वडे हे पार्टीला किंवा इतर वेळी सुद्धा बनवता येतात. दही वडे ही डीश लहान तसेच मोठ्याना सुद्धा आवडते. बनवायला एकदम सोपी आहे व अगदी टेस्टी लागते. तसेच थंड दही वडे अगदी अप्रतीम लागतात.
The English language version of the preparation method of the Dahi Vadas can be seen here- Dahi Vada-Chutney
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
उडीदडाळ भिजवण्यासाठी वेळ: ३ तास
वाढणी: १५-१६ वडे बनतात
साहित्य: वडे बनवण्यासाठी वेळ:
१ कप उडीदडाळ
१०-१२ किसमिस
१ हिरवी मिरची
मीठ चवीने
तेल वडे तळण्यासाठी
गोड दह्यासाठी:
५०० ग्राम दही
१/२ कप साखर
१/४ कप दुध
मीठ चवीने
सजावटीसाठी:
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून मिरी पावडर
१ टी स्पून धने-जिरे पावडर
२ टे स्पून कोथंबीर (चिरून)
चिंचेची चटणी बनवण्यासाठी:
१/४ कप चिंचेचा कोळ (चिंचेचा कोळ बनवण्यासाठी
(१/४ कप चिंच १/४ कप गरम पाण्यात १-२ तास भिजत ठेवून मग त्याचा हातानी दाबून कोळ काढा.)
१/४ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून काळे मीठ
१/४ टी स्पून धने-जिरे पावडर
१/४ कप गुळ
१५ किसमिस
१ टी स्पून तेल
कृती:
उडीदडाळ धुवून पाण्यामध्ये २ तास भिजत ठेवा.
दह्यामध्ये साखर व दुध मिक्स करून दही फ्रीझमध्ये थंड करायला ठेवा.
चिंचेच्या चटणीसाठी: एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये किसमिस, चिंचेचा कोळ, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, काळे मीठ (शिन्देलोन-पंदेलोन मीठ) गुळ घालून मंद विस्तवावर घट्ट होई परंत शिजवून घ्या.
उडीदडाळ, मीठ, हिरवी मिरची व दोन टे स्पून पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. वाटून झाल्यावर एका बाऊल मध्ये मिश्रण काढून हातानी चांगले फेसून घ्या व पाच मिनिट बाजूला ठेवा.
एका कढईमधे तेल गरम करून एक एक टेबलस्पून मिश्रण घेवून गरम तेलात सोडा व गुलाबी रंगावर छान वडे तळून घ्या.
एका मोठ्या बाऊल मध्ये कोमट पाणी घेवून त्यामध्ये तळलेले वडे २ मिनिट बुडवून ठेवा. मग एका डेकोरेटीव्ह प्लेटमध्ये सगळे वडे ठेवा त्यावर थंड गोड दही घालून वड्यावर लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, चिंचेची चटणी व कोथंबीरने सजवा. दही वड्याची प्लेट फ्रीजमध्ये दोन तास थंड करायला ठेवा.
छान थंड झालेले दही वडे सर्व्ह करा.