टू इन वन आईसक्रिम: आईसक्रिम म्हंटले की सगळ्याच्या तोंडाला पाणी येते. छान गार गार आईसक्रिम हे सर्वांना आवडते. लहान मुलांना तर आईसक्रिम हे अतिशय प्रिय आहे. जर आपण आईसक्रिममध्ये वेगवेगळे आईसक्रिम मिक्स करून बनवले तर मुलांना ते खूपच आवडेल. मी टू इन वन आईसक्रिम बनवतांना व्ह्नीला व स्ट्रॉबेरी वापरले आहे. हे कॉमबीनेशन खूप छान लागते तसेच दिसायला पण सुंदर दिसते. आईस्क्रीम घरी छान बनवता येते तसेच बनवायला पण सोपे आहे. घरी आईस्क्रीम बनवण्याची मज्जा पण वेगळीच आहे.
बेसिक आईसक्रिम बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
बेसिक आईसक्रिम सेट करण्यासाठी वेळ: ७-८ तास
व्ह्नीला आईसक्रिम बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
स्ट्रॉबेरी आईसक्रिम बनवण्यासाठी वेळ: ५ मिनिट
व्ह्नीला व स्ट्रॉबेरी आईसक्रिम सेट करण्यासाठी वेळ: २-३ तास
वाढणी: ६ जणासाठी
साहित्य:
बेसिक आईसक्रिम:
२ कप दुध (गाईचे)
५ टे स्पून साखर
२ टे स्पून मिल्क पावडर
१ १/२ टे स्पून कॉर्नफ्लोर
१ १/२ टे स्पून GMS पावडर
१/४ टी स्पून स्टॅबिलायझर पावडर
व्हानीला आईसक्रिम:
१/२ कप फ्रेश क्रीम
१/४ टी स्पून व्हनीला इसेन्स
स्ट्रॉबेरी आईसक्रिम:
२ टे स्पून स्ट्रॉबेरी सॉस किंवा क्रश
कृती:
एक कप दुध तापवायला ठेवा. उरलेल्या दुधात साखर, मिल्क पावडर, कॉर्नफ्लोर, GMS पावडर, स्टॅबिलायझर पावडर
घालून मिक्स करून गरम करत ठेवलेल्या दुधात मिक्स करून पाच मिनिट दुध मंद विस्तवावर हलवत गरम करून घ्या. मिश्रण गरम झाल्यावर थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर डीप फ्रीझमध्ये ७-८ तास सेट करायला ठेवा.
बेसिक आईसक्रिम सेट झाल्यावर बाहेर काढून त्याचे तुकडे करून त्यामध्ये क्रीम व व्हनीला इसेन्स घालून ब्लेंडरने ५ मिनिट ब्लेंड करून घ्या. मग दोन भाग करून एक भाग अलुमीनीयन च्या डब्यामध्ये सेट करायला ठेवा. दुसऱ्या भागामध्ये स्ट्रॉबेरी सॉस घालून परत २ मिनिट ब्लेंडरने ब्लेंड करून दुसऱ्या डब्यात ओतून डीप फ्रीजमध्ये २ तास सेट करायला ठेवा.
दोन तास झाल्यावर व्ह्नीला व स्ट्रॉबेरी आईस्क्रीम डीप फ्रीज मधून काढून मग स्ट्रॉबेरी आईस्क्रीम वर व्ह्नीला आईसक्रिम ठेवून परत तीस मिनिट सेट करायला ठेवा.
आईसक्रिम सेट झाल्यावर मग सर्व्ह करा.