यात का मेन (न्युडल) सूप : एक चायनीज पारंपारिक सूप आहे. ह्या सुपाची चव एकदम वेगळी व टेस्टी लागते. हे सूप बनवतांना बोनलेस चिकनचे तुकडे, मश्रूम, व चिकन स्टॉक वापरला आहे. त्यामुळे सुपाची चव छान लागते.
The English language version of this speciality Chinese Soup preparation method is published here – Yat Ka Mein Soup
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जण
साहित्य:
१ कप नुडल्स (शिजवलेल्या)
१ १/२ कप बोनलेस चिकनचे तुकडे
१ १/२ कप मश्रूम
१ १/२ टी स्पून काळी मिरे पावडर
१ टे स्पून सोया सॉस
२ टे स्पून बटर
१ टे स्पून कॉर्नफ्लोर
१/२ कप पाणी
मीठ चवीने
४ कप चिकन स्टॉक
कृती:
शिजवलेल्या न्युडल्स चार बाऊलमध्ये सम प्रमाणात घाला.
एका नॉनस्टिक कढईमधे बटर गरम करून त्यामध्ये बोनलेस चिकनचे तुकडे, मीठ घालून थोडेसे फ्राय करून घ्या मग त्यामध्ये मश्रूम १ कप पाणी घालून घालून मिक्स करून मंद विस्तवावर १० मिनिट शिजवून घ्या. मग त्यामध्ये चिकनचा स्टॉक व कॉर्नफ्लोर मिक्स करून घालून चांगली उकळी आणा. उकळी आल्यावर न्युडल ठेवलेला बाऊलमध्ये ओतून गरम गरम सर्व्ह करा.