कपड्यांचा पांढरेपणा टिकवण्यासाठी (Whiteness) : लेख मराठीत
कपड्यांचा पांढरेपणा टिकवण्यासाठी क्लोरोजीन अथवा क्लोरीवँट वापरतात. हे फक्त पांढऱ्या कपड्यासाठी वापरावे. पांढरा कपडा पाच ते सहा वेळा धुवून झाल्यावर अर्धी बादली पाण्यात २-३ थेंब क्लोरोजीन घालून ५-१० मिनिट कपडे तसेच पाण्यात भिजत ठेवावे. मग पाणी काढून वाळवून हलकी इस्त्री करावी. टेरीकॉट अथवा टेरीलीनच्या कपड्यासाठी सुद्धा हे उपयोगी आहे.
The English language version of this article can be seen here- Dry Clean and Starch Silk Sarees at Home
ब्लीचिंग:(Bleaching)
कॉटनच्या कपड्याचा पांढरेपणा टीकवण्यासाठी अर्धी बादली उकळते पाणी घेवून त्यामध्ये एक टी स्पून ब्लीचिंग पावडर घालून त्यावर एक चलणी ठेवायची व चाळणी वर कपडे ठेवून द्यायचे म्हणजे ब्लीचिंगच्या गरम पाण्याची वाफ कपड्यांना बसते. कपडे पूर्ण गरम होई परंत ठेवायचे. मग कपडे धुवायचे. यामुळे कपड्यावर पडलेले घामाचे डाग सुद्धा जातात.
सिल्कच्या कपड्यांना ड्रायक्लीनिंग व स्टार्च कसे करायचे: (Silk Clothes Dry cleaning)
सिल्कच्या कपड्यांना ड्रायक्लीनिंग करण्यासाठी अँसिटिक अँसीड वापरायचे. ड्रायक्लीनिंग करण्यासाठी अर्धी बादली पाण्यात तीन टेबल स्पून अँसिटिक अँसीड घालून एक टेबल स्पून सर्फ पावडर घालून चांगले मिक्स करून मग सिल्कची साडी ५-७ मिनिट पाण्यामध्ये भिजवून भाताने चांगली चोळायची फक्त फॉल ब्रशने हळू घासावा. मग साडी पाण्यातून काढून साडीतील पाणी दाबून काढावे.
दुसऱ्या अर्धी बादली पाण्यात एक टे स्पून अँसिटिक अँसीड घालून साडी घालावी. हातानी चोळून परत पाण्यातून साडी काढावी.
आता तिसऱ्या अर्धी बादली पाण्यात एक टे स्पून अँसिटिक अँसीड घालून साडीपरत पाण्यातून काढावी.
जर सिल्क साडी पांढरी असेलतर सिल्कदवा एक तुकडा घालावा म्हणजे साडीचा पांढरे पणा कायम रहातो. मग साडीतील पाणी दाबून काढून साडी थोडीशी सुकवून घ्यावी. साडी थोडीशी ओली असतांना इस्त्री करावी. (साडी पूर्ण सुकवून इस्त्री करू नये त्यामुळे साडीला सुरकुत्या पडतात)
सिल्कच्या साडीला सौम्य स्टार्च केल्याने साडी छान कडक होते व सुंदर दिसते. सिल्क साडीला स्टार्च कसे करायचे त्यासाठी स्टार्च कसे करायचे ही माहिती वाचा.
लाँड्री स्टार्च कसा करायचा: (Laundry Starch)
स्टार्च करतांना अरारुट पावडर वापरावी (अगदी स्वस्त व मस्त) एक कप थंड पाण्यात स्टार्च पावडर पेस्ट करून घ्यायची. एक लिटर उकलेले पाणी घेवून त्यामध्ये पाण्यात स्टार्चची पेस्ट घालून चांगले हलवून घ्यावे. रंग बदलला की स्टार्च तयार झाला. पाणी थोडे कोमट झाले की मग कपडा भिजवावा (गरम पाण्यात कपडे भिजवले तर रंग जायची भीती असते.)
आता विविध कपड्यांना कसे स्टार्च करायचे ते बघू या.
कडक स्टार्च: कडक स्टार्च करायचा असेल तर चार टे स्पून स्टार्च पावडर वापरायची. हा स्टार्च प्ँट किंवा स्कर्ट ह्या कपड्यांना उपयोगी आहे.
मध्यम स्टार्च: मध्यम स्टार्च करायचा असेलतर तीन टे स्पून स्टार्च पावडर वापरायची. अशा प्रकारचा स्टार्च कॉटन शर्ट किंवा कॉटन ड्रेस किंवा साडीसाठी उपयोगी आहे.
सौम्य स्टार्च: सौम्य स्टार्च करायचा असेल तर दोन चमचे स्टार्च पावडर वापरायची. टेरीन साड्या, लखनवी साड्या, झब्बे, सिल्कच्या साड्याना ह्या पद्धतीने स्टार्च करता येतो.
आपल्याला अजून काही प्रकारचे स्टार्च घरी करता येतात.
साबुदाण्याचा स्टार्च:
साबुदाण्याचा स्टार्च करण्यासाठी दोन टे स्पून साबुदाणा एक कप कोमट पाण्यात आधल्या दिवशी रात्री भिजत घालायचा. मग दुसऱ्या दिवशी हातानी भिजवलेल्या साबुदाण्याची पेस्ट करायची. एक लिटर उकळते पाणी घेवून त्यामध्ये साबुदाण्याची पेस्ट घालून हलवून घ्यायची थोडे थंड झाले की कपडा दहा मिनिट भिजवून द्या मग काढून थोडा पिळून अर्धवट वाळवून मग इस्त्री करावी.
थंड स्टार्च:
एक कप पाण्यात दोन टे स्पून स्टार्च पावडर पेस्ट करून घ्यायची मग एक लिटर पाण्यात ही पेस्ट मिक्स करून घेऊन कपडा दहा मिनिट भिजवावा, पिळून अर्धवट सुकवून मग कडक इस्त्री करावी. सिस्टर क्ँप किंवा मुलांच्या पांढऱ्या हाफ प्ँट साठी हा स्टार्च उपयोगी आहे.
लोकरीच्या कपड्याची काळजी कशी घ्यायची: (Woolen Clothes)
लोकरीचे कपडे नेहमी धुवावेत त्यामुळे त्यावर गोळे येत नाहीत. लोकरीच्या कपड्यांना ड्रायक्लीन सुद्धा करता येते.
लोकरीचे कपड्यांना चकाकी येण्यासाठी ग्लिसरीन वापरावे. वरीलप्रमाणे ड्रायक्लीन केल्यावर तिसऱ्या पाण्यात तीन चमचे ग्लिसरीन वापरावे. लोकरीचे कपडे बादलीत पाणी घेवून पाण्यातल्या पाण्यात धुवावेत म्हणजे त्याचा आकार बदलत नाही. पाणी हाताने दाबून काढून सुकवून मग हलकी इस्री करावी. कपडे ओले असतांना इस्त्री केली तर कपड्याचा आकार बदलतो.