पुदिन्याचे औषधी गुणधर्म: पुदिना ही एक वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप औषधी व उपयोगी आहे. पुदिन्यामध्ये जीवनसत्व “ए” हे भरपूर प्रमाणात आहे. तसेच पुदिन्यामध्ये सर्व रोगांना मुक्ती देणारी वनस्पती आहे.
आपण पुदिन्याचा वापर चटणी, भाजी आमटी व नॉनव्हेज च्या पदार्थामध्ये घालण्यासाठी वापरतो त्यामुळे आपल्या पदार्थाला चांगली चव येते व छान सुगंध सुद्धा येतो.
आपल्या घरासमोर अथवा कुंडीमध्ये आपण तुळशीचे रोप लावतो कारण ते आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे तसेच पुदिन्याचे रोप पण आपल्या घरासमोर किंवा कुंडीमध्ये लावावे त्यामुळे घरात कोणाला सर्दी होत नाही.
पुदिन्याचे अनेक औषधी गुण आहेत. पुदिन्याच्या पानांचा रस हा फायदेशीर आहे त्याच्या सेवनाने छातीतील कफ कमी होते, अपचनाचे विकार नाहीसे होतात, दम्याच्या विकारावर पण गुणकारी आहे, आपल्या जेवणात रुची उत्प्पन्न करतो, शरीरातील वायू कमी करतो, खोकल्यावर पुदिना हा उपयोगी आहे. उलटी बंद करण्यासाठी उत्तम औषध आहे. आपली पचनशक्ती वाढवतो.
पुदिन्याची चटणी बनवतांना त्यामध्ये खारीक, मिरे, मीठ, हिंग, काळी द्राक्ष, लिंबूरस व जिरे एकत्र करून वाटावे, ह्या चटणीच्या सेवनाने तोंडाला रुची येते, वायू दूर होऊन चांगली भूक लागते.
पुदिन्याच्या पानांचा रस व आले घालून बनवलेला थंडी ताप बरा होऊन सर्दी कमी होते. पुदिन्याच्या रसाने आतड्याचे विकार व पोट दुखी बरी होते. असा हा गुणकारी पुदिना आहे.