इडली – डोसा – उत्तप्पा – बटाटा वडा – मेधू वडा – समोसा – चटणी: इडली बरोबर कोरड्या किंवा ओल्या प्रकारच्या चटण्या बनवतात. ही चटणी इडली किंवा डोश्या बरोबर सर्व्ह करायला छान आहे. चटणी बनवतांना चणाडाळ, शेंगदाणे, ओला नारळ, लसूण, साखर, जिरे, पंढरपुरी डाळ, हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे ही चटणी पौस्टिक तर आहेच व वरतून फोडणी दिल्यामुळे छान खमंग लागते. वरतून दही मिक्स केल्याने त्याची चव खूप चांगली लागते. अश्या प्रकारची इडली चटणी बनवायला सोपी आहे.
The English language version of this fast food Chutney preparation method can be seen here – Chutney for South Indian Snacks and Fast Food dishes
बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ टे स्पून चणाडाळ
१/२ टे स्पून शेगदाणे
१ कप ओला नारळ (खोवून)
४ लसूण पाकळ्या
१/४ टी स्पून जिरे
२ टे स्पून पंढरपुरी डाळ
१/२ कप दही
३ हिरव्या मिरच्या
२ टे स्पून कोथंबीर
साखर व मीठ चवीने
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१/४ टी स्पून हिंग
१ लाल सुकी मिरची
७-८ कडीपत्ता पाने
कृती:
चणाडाळ ४-५ तास भिजत ठेवा, शेगदाणे भाजून साले काढून घ्या, ओला नारळ खोवून घ्या, कोथंबीर धुवून चिरून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात चणाडाळ, शेगदाणे, पंढरपुरी डाळ, ओला नारळ, हिरवी मिरची, लसूण, कोथंबीर, साखर, मीठ , जिरे, १/४ कप पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून मोहरी, हिंग, कडीपत्ता पाने, लाल मिरची घालून फोडणी करून वाटलेल्या चटणी वरती घालून मिक्स करून मग दही मिक्स करावे.
इडली, डोसा किंवा मेदू वड्या बरोबर ही चटणी सर्व्ह करावी छान लागते.