अंड्याचे पोहे: कांदा पोहे म्हंटल की महाराष्ट्रीयन लोकांची लोकप्रिय डीश आहे. फक्त पोहे ही डीश महाराष्ट्रात नाहीतर बाहेर सुद्धा लोकप्रिय आहे व सर्वांना आवडते सुद्धा. पोहे नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. पोहे हे पौस्टीक आहेत. आपण पोहे बनवतांना उकडलेले बटाटे , हिरवे ताजे मटार, किंवा सोडे घालून सुद्धा बनवू शकतो. अंड्याचे पोहे बनवतांना अंडे फोडून चांगले फेटून घेतले आहे. मुले अंडे खायचा कंटाळा करतात किंवा त्यांना आवडत नाही. अंडे घालून पोहे बनवलेले चवीस्ट लागतात व ते पौस्टिक आहेत.
The English language version of this Maharashtrian Kande Pohe recipe preparation method can be seen here- Eggs-Kande Poha
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
३ कप जाडे पोहे (Rice Flakes)
१ मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
१ अंडे (फेटून)
३-४ हिरव्या मिरच्या (१/२” चे तुकडे करून)
मीठ चवीने
१ टी स्पून लिंबूरस
१ टी स्पून साखर
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१/४ कप ओले खोबरे (खोवून)
फोडणीसाठी
१ १/२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून मोहरी
१/४ टी स्पून हळद
कृती:
पोहे चाळून पाण्यानी धुवून घ्या. अंडे फोडून काटे चमचानी फेटून घ्या. कांदा, हिरवी मिरची व कोथंबीर चिरून घ्या. खोबरे खोऊन घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे घालून चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालून २-३ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, मीठ, फेटलेले अंडे घालून अर्धा मिनिट तसेच ठेऊन धुतलेले पोहे, लिंबूरस, साखर घालून कोथंबीर घालून मिक्स करून घेऊन कढई वर झाकण ठेवून २-३ मिनिट मंद विस्तवावर चांगली वाफ येवू द्या.
कोथंबीर, खोबरे घालून गरम गरम पोहे सर्व्ह करा.