मँगो मस्तानी: मस्तानी हे नावच इतके सुंदर आहे मग आंब्याची मस्तानी म्हणजे की सुंदर असेल. मँगो मस्तानी ही पुण्यातील लोकप्रिय पेय आहे. मँगो मस्तानी हे एक डेझर्ट म्हणून करता येते. आंबा हे सगळ्याचे आवडते फल आहे. आंब्या पासून वेगवेगळ्या चवीस्ट डीश अथवा पदार्थ बनवता येतात. आंब्याचा सुगंध इतका सुंदर असतो की त्याचे पदार्थ अप्रतीम होतात. मँगो मस्तानी हे ड्रिंक खूप छान लागते व बनवण्यासाठी सोपे व झटपट बनणारे आहे. मँगो मस्तानी बनवतांना हापूस आंबा वापरावा त्याने हे ड्रिंक चांगले बनते. हापूस आंब्याचा मिल्क शेक व त्यामध्ये व्ह्नीला किंवा मँगो आईसक्रिम घालून ड्रायफ्रुटने अथवा फ्रेश क्रीमने सजवावे.
समर सीझनमध्ये मुलांना घरी वेगवेगळी थंड पेय लागतात. मुलांसाठी हे पेय उत्कृष्ट आहे.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य
४ कप दुध
२ कप आंब्याचा रस
२ टे स्पून साखर
४ टे स्पून (स्कूप) व्ह्नीला किंवा मँगो आईसक्रिम
२ टे स्पून फ्रेश क्रीम (आवडत असेलतर फेटून घालावे)
ड्रायफ्रुट सजावटीसाठी
बर्फाचे तुकडे
कृती: आंब्याचा रस काढून त्यामध्ये साखर घालून मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यावे.
दुध, आंब्याचा रस मिक्स करून परत मिक्सरमध्ये ब्लेंड करावे. मग आईस क्युब, व्ह्नीला किंवा मँगो आईसक्रिमचा एक स्कूप घालून वरतून फ्रेश क्रीम आवडत असेल तर घालवे व ड्रायफ्रुटने सजवावे.