टेस्टी होम मेड व्हेज बर्गर: टेस्टी होम मेड व्हेज बर्गर ही मुलांची अगदी आवडती डीश आहे. हे बर्गर बनवतांना पुदिना चटणी वापरली आहे पुदिनामध्ये जीवनसत्व “ए” भरपूर असते तसेच पुदिना आपल्या आरोग्याला खूप गुणकारी आहे जगातील सर्व रोगांना मुक्ती देणारा आहे असे मानतात.
टोमाटो सॉस व टोमाटो स्लाईस वापरली आहे. टोमाटो मध्ये आपल्या शरीराला लागणारे सर्व घटक लोह, क्षार भरपूर प्रमाणात आहे. काकडी ही आपल्या शरीराला थंड असते. चीज मुलांनातर प्रिय असतेच व ते गुणकारी सुद्धा आहे.
बर्गर मध्ये बटाट्याची टिक्की वापरली आहे. टिक्की बनवतांना बटाटे, आले-हिरवी मिरची, ब्रेडचा चुरा, कोथंबीर, लिंबूरस वापरला आहे. तसेच बन लोण्यामध्ये भाजले आहेत त्यामुळे छान खमंग व चवीस्ट लागतात त्यामुळे बर्गरला चांगली चव येते. त्यामुळे मुलांचे पोट सुद्धा भरते.
The English language version of the preparation method of this Veg Burger recipe can be seen here – Tasty Veg-Burger
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ८ बर्गर बनतात
साहित्य:
८ लादी पाव किंवा बन
८ आलू टिक्की किंवा पॅटीस (रेसिपी पहा)
१ कप पुदिना चटणी (रेसिपी पहा)
१/२ कप टोमाटो केचप
१ मोठ्या आकाराची काकडी
१ मोठ्या आकाराचा टोमाटो
३ चीज क्यूब
१/२ कप बटर (लोणी)
कृती
आलू टिक्की अथवा पॅटीस बनवून घ्या त्याची रेसिपी दिलेली आहे ती बघा.
पुदिना चटणी बनवून घ्या त्याची रेसिपी दिलेली आहे ती बघा.
काकडी टोमाटो धुवून त्याचे गोल गोल चकती कापून घ्या.
२ चीज क्यूबचे ८ स्लाईस कापून घ्या व एक क्यूब किसून घ्या.
पावला मधून कापून घेवून त्याचे दोन भाग करा व त्याला थोडे लोणी लावून घ्या. नॉन स्टिक तवा गरम करून त्यावर पाव थोडा भाजून घ्या. पावाच्या आतील बाजूस दोन्ही भागांना प्रथम पुदिना चटणी, टोमाटो केचप लावून घ्या मग एका भागावर एक चीजची स्लाईस, टोमाटोची स्लाईस, पॅटीस मग काकडीची स्लाईस ठेवून पावाचा दुसरा भाग ठेवून बंद करा.
गरम गरम बर्गर सर्व्ह करतांना वरतून चीज घालून सजवा.