मँगो मिल्क शेक: मँगो मिल्क शेक हे डेझर्ट किंवा जेवणा नंतर द्यायला एक सुंदर ड्रिंक आहे. आंब्याच्या रसापासून बनवलेला कोणताही पदार्थ अप्रतीम लागतो.कारण आंब्याचा सुगंध छान व मधुर असतो. मँगो मिल्क शेक हे पेय चवीला अप्रतीम लागते. मँगो मिल्क शेक बनवतांना आंब्याचा घट्ट रस थोडे दुध, साखर, केशर घालून बनवावा. अंबा हा सर्वांना प्रिय आहे त्यामुळे आंब्या पासून बनवलेले सगळे पदार्थ सर्वांना नक्की आवडतीलच. केशर घालून मिल्क शेक बनवले तर त्याची चव अजून छान लागते.
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
थंड करायचा वेळ: २ तास
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ मोठे आंबे (हापूस/ केसरी)
३ कप दुध
२ टे स्पून फ्रेश क्रीम
१/४ टी स्पून केशर
२ टे स्पून साखर
आईस क्यूब
कृती:
आंबे धुवून त्याचा रस काढून घ्या. आंब्याचा रस व साखर मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या. मग त्यामध्ये दुध व केशर घालून परत ब्लेंड करून घ्या. एका भांड्यात मिश्रण ओतून फ्रीजमध्ये दोन तास थंड करायला ठेवा.
फ्रेशक्रीममध्ये १ टे स्पून दुध घालून चांगले फेटून घ्या.
थंड झालेले आंब्याचे मिल्कशेक ४ ग्लास मध्ये ओतून वरतून एक आईस क्यूब घालून फेटलेले फ्रेश क्रीम घालून सर्व्ह करावे.
मँगो मिल्क शेक हे थंडच सर्व्ह करावे जर ते थंड नसेल तर त्याचे टेस्ट बदलते.