उपवासाची बटाटा भजी: उपवासाची बटाटा भजी ही टेस्टी लागतात तसेच ती छान कुरकुरीत होतात. उपवासाचे पकोडे बनवण्यासाठी बटाटे व शिंगाडा पीठ वापरले आहे. अश्या प्रकारची भजी इतर वेळी सुद्धा बनवायला छान आहेत ह्याची टेस्ट वेगळीच लागते. उपवासाची बटाटा भजी ही आपण नवरात्रीच्या उपासासाठी अथवा इतर उपासाच्या दिवशी बनवू शकता.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
दोन मोठे बटाटे
दोन कप शिंगाडा पीठ
एक चमचा लाल तिखट पावडर
एक टे स्पून तूप (कडकडीत)
मीठ चवीने
तूप तळण्यासाठी
कृती:
बटाटे धुवून सोलून गोल चकत्या कापून घ्या. मग मिठाच्या पाण्यात पाच मिनिट भिजत ठेवावी म्हणजे बटाटे काळे पडणार नाहीत.
एका बाऊल मध्ये शिंगाडा पीठ, लाल तिखट पावडर, गरम तेल, मीठ मिक्स करून पाणी घालून भज्याच्या पिठासारखे भिजवून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून घ्या. एक एक बटाट्याची चकती घेवून पीठामध्ये भिजवून गरम तेलामध्ये सोडावे व छान खरपूस भजी तळून घ्यावीत.
गरमा गरम भजी सर्व्ह करावीत.