उपवासाचे बटाट्याचे थालीपीठ: उपवास म्हंटले की आपल्याला प्रश्न पडतो की फराळासाठी काय बनवायचे, नेहमी नेहमी तेच तेच बनवून कंटाळा येतो. उपवासाचे बटाट्याचे थालीपीठ ही एक छान रेसिपी आहे.तसेच बनवायला सोपी व झटपट होणारी आहे. ह्यामध्ये बटाटे किसून त्यामध्ये मावेल तेव्हडे शिंगाडा पीठ, वरइ पीठ अथवा साबुदाणा पीठ वापरले आहे. त्यामुळे थालीपीठ छान कुरकुरीत होते. चवी साठी शेंगदाणे कुट लाल मिरची पावडर, जिरे, कोथंबीर वापरले आहे.
बटाट्याचे थालीपीठ आपण इतर वेळी नाश्त्याला सुद्धा बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ थालीपीठ
साहित्य:
३ मध्यम आकाराचे बटाटे
१ कप शेंगदाणे कुट
१ टी स्पून लाल मिरची पावडर
साखर व मीठ चवीने
१/२ कप कोथंबीर (बारीक चिरून)
१ टी स्पून जिरे
१ कप शिंगाडा पीठ/ वरई पीठ/साबुदाणा पीठ (तिन्ही पैकी एक कोणतेही)
तेल अथवा तूप थालीपीठ भाजण्यासाठी
कृती:
बटाटे धुवून, सोलून, किसून घ्यावीत व पाण्यात भिजत ठेवावे म्हणजे काळे पडणार नाही नंतर पाण्यातून काढवे.
एका परातीत किसलेले बटाटे, शेंगदाणे कुट, लाल तिखट पावडर, जिरे, कोथंबीर, मीठ, साखरघालून एक सारखे करावे मग त्यामध्ये जेव्हडे मावेल तेव्हडे पीठ पीठ घालून चांगले मळून घ्यावे.
नॉनस्टिक तव्यावर तेल अथवा तूप लावून त्यावर छोटे थालीपीठ घालून बाजूनी तेल अथवा तूप सोडून छान खरपूस भाजून घ्यावीत.
गरम गरम थालीपीठ दह्या बरोबर किंवा उपवासाच्या लोणच्या बरोबर सर्व्ह करावे.