कोलंबी कबाब: कोलंबीचे कबाब हे बनवायला फार सोपे आहेत. झिंग्याचे कबाब हे आपल्याला स्टारटर म्हणून करता येतात. हे कबाब बनवतांना कोलंबी लहान आकाराची वापरावी म्हणजे लवकर शिजते.
The English language version of this Kolambi Kabab preparation method can be seen here- Konkani Kolambi Kabab
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप कोलंबी (लहान सोलून घ्या)
२ मध्यम आकाराचे कांदे (चिरून)
४ हिरव्या मिरच्या
६ लसूण पाकळ्या
१/२ टी स्पून जिरे
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१ टी स्पून हळद पावडर
४ टी स्पून लिंबूरस
१ अंडे
२ स्लाईस ब्रेड ( पाण्यात भिजवून)
मीठ चवीने
१/२ कप ब्रेड क्रम (कोरडा)
तेल कबाब तळण्यासाठी
कृती: कोलंबी सोलून स्वच्छ धुऊन घेवून पाट्यावर थोडी ठेचावी.
ब्रेड थोड्या पाण्यामध्ये ३० सेकंद भिजत ठेवून पाणी दाबून काढावे.
कोलंबी व बाकीचे सर्व साहित्य मिक्स करावे (फक्त तेल व ब्रेड क्रम घालू नये) नंतर मिश्रणाचे १२ ते १४ भाग करावे
एका कढईमधे तेल गरम करून घ्या. एक एक कोलंबीच्या मिश्रणाचा गोळा घेवून ब्रेड क्रम मध्ये घोळून ब्राऊन रंगा वरती डीप फ्राय करावे.
गरम गरम कोलंबीचे कबाब बटाट्याच्या वेफर्स बरोबर सर्व्ह करावे.