कैरीचे पन्हे: कच्या कैरीचे पन्हे हे स्वादीस्ट लागते. उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे फायदेशीर आहे त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते. कैरीचे पन्हे हे महाराष्ट मध्ये लोकप्रिय आहे. मराठीत कैरीचे पन्हे म्हणतात हिंदीत आमका पन्हा म्हणतात. कैरी पन्हे च्या सेवनाने फ्रेश वाटते तसेच ते आरोग्य कारक सुद्धा आहे, बनवायला सोपे व झटपट होणारे आहे.
The English language version of this cold drink preparation can be seen here- Chilled Kairiche Panhe
The video of the same Maharashtrian Raw Mangoes Panhe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=BHy3uKc1lF0
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ६ ग्लास
साहित्य:
२ मोठ्या कच्या कैऱ्या
३/४ कप साखर अथवा गुळ
१/४ टी स्पून वेलचीपूड
१/४ टी स्पून केशर
मीठ चवीने
सजावटीसाठी पुदिना पाने
कृती:
कच्ची कैरी धुवून घ्यावी. मग एका जाड बुडाच्या भांड्यात कैरी बुडेल इतपत पाणी घेवून १५ मिनिट मंद विस्तवावर उकडून घ्यावी. किंवा डाळ-भात लावण्यासाठी कुकर लावतांना कुकर मध्ये सुद्धा कैरी छान उकडली जाते.
कैरी उकडून झाल्यावर थंड करायला ठेवा. उकडलेली कैरी थंड झाल्यावर त्याची साले काढून त्याचा गर काढून घ्यावा. कैरीचा गर, साखर अथवा गुळ, वेलचीपूड, मीठ घालून मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यावे. कैरीचा गर भाड्यात काढून त्यामध्ये ४ ग्लास पाणी घालून चांगले मिक्स करून फ्रीझमध्ये २ तास थंड करायला ठेवा.
कैरीचे पन्हे थंड झाल्यावर सर्व्ह करतांना केशर, बर्फाचा चुरा व पुदिना पान घालून सर्व्ह करावे.
टीप: कैरीच्या पन्ह्यामध्ये साखरे आयवजी गुळ वापरून सुद्धा छान लागते.
कैरीचा गर, साखर, मीठ घालून मिक्सरमधून काढून हा गार १०-१५ दिवस फ्रीझमध्ये चांगला रहातो, आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी मिक्स करून कैरीचे पन्हे बनवता येते.