खमंग कॉलीफ्लॉवर पुलाव: आपण नेहमी वर्ण-भात, आमटी-भात बनवतो. कॉली फ्लॉवर पुलाव हा आपण जेवणात वेगळेपण म्हणून बनवता येतो. कॉली फ्लॉवर पुलाव हा चवीला छान लागतो. लहान मुलांना नक्की आवडेल. हा पुलाव बनवतांना कॉली फ्लॉवरचे तुरे हळद-मीठ लाऊन तळून घेतले आहेत. त्यामुळे कॉली फ्लॉवरचा उग्र दर्प येत नाही.
The English language version of this Pulao recipe preparation method can be seen here- Maharashtrian Flower Bhaat
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप तांदूळ (बासमती किंवा दिल्ली राईस)
१ कप कॉली फ्लॉवरचे तुरे
१ टी स्पून लिंबूरस
२ टे स्पून कोथंबीर पाने (चिरून) मीठ चवीने
मसाला पुलावासाठी:
१ मध्यम आकाराचा कांदा
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
३ हिरव्या मिरच्या पेस्ट
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
१/४ टी स्पून धने-जिरे पावडर
१ टी स्पून गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला
फोडणीसाठी:
१ टे स्पून तेल
४ लवंग
३ हिरवे वेलदोडे
२ तमलपत्र
१/२” दालचीनी तुकडा
१ टी स्पून शहाजिरे
१/४ कप तेल कॉलीफ्लॉवर तळण्यासाठी
कृती:
तांदूळ धुवून २० मिनिट बाजूला ठेवा. कॉलीफ्लॉवरचे तुरे धुवून त्याला हळद-मीठ लावून ५ मिनिट बाजूला ठेवा.
एका कढईमधे तेल गरम करून कॉलीफ्लॉवरचे तुरे तळून घ्या.
कुकरमध्ये एक टे स्पून गरम करून त्यामध्ये लवंग, हिरवे वेलदोडे, तमलपत्र, दालचीनी तुकडा, शहाजिरे, चिरलेला कांदा घालून दोन-तीन मिनिट परतून घ्या. त्यामध्ये आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट घालून एक मिनिट परतून धुतलेले तांदूळ, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला अथवा बिर्याणी मसाला घालून २ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये चवी नुसार मीठ, लिंबूरस, तळलेले कॉलीफ्लॉवरचे तुरे, ४ कप गरम पाणी घालून कुकरचे झाकण लावून दोन शिट्या काढा.
गरम गरम कॉलीफ्लॉवरचा पुलाव सर्व्ह करा. सर्व्ह करतांना कोथंबीरने सजवा.