बालुशाही: बालुशाही ही एक चवीस्ट स्वीट डीश आहे. दिवाळीच्या फराळामध्ये सुद्धा करायला छान आहे. बनवायला फार सोपी आहे. बालुशाही ह्या पद्धतीने बनवली तर छान खुसखुशीत होते. बालुशाही बनवतांना मैदा, दही, तूप व बेकिंग पावडर वापरली आहे, बालुशाही सजावटीसाठी खवा व ड्राय फ्रुट वापरले आहेत. बालुशाही ही इतर वेळी सुद्धा बनवायला छान आहे.
The English language version of the preparation method of the Balushahi can be seen here- Homemade Balushahi
बनवण्यासाठी वेळ: ८० मिनिट
वाढणी: १६ बनतात
साहित्य:
२ कप मैदा
१/२ टी स्पून बेकिंग पावडर
६ टे स्पून तूप (गरम)
६ टे स्पून दही
साखरेचा पाक बनवण्यासाठी:
२ १/२ कप साखर
१ कप पाणी २ टे स्पून दुध
१ टी स्पून वेलचीपूड
सजावटीसाठी:
१/२ कप खवा
६ बदाम (काप करून)
६ काजू (काप करून)
६ पिस्ता (काप करून)
१/४ कप पिठीसाखर
१/४ टी स्पून वेलचीपूड
तूप बालुशाही तळण्यासाठी
कृती
मैदा व बेकिंग पावडर मिक्स करून चाळून घ्या. दही फेटून घ्या.
चाळलेल्या मैद्यामध्ये गरम तूप घालून हाताने चांगले मिक्स करून घेऊन मग त्यामध्ये फेटलेले दही मिक्स करून चांगले मळून घ्या व अर्धातास बाजूला ठेवा.
अर्धातास झाल्यावर त्याचे १६ एक सारखे गोळे बनवून घ्या प्रत्येक गोळ्याला बोटाने मध्ये थोडे दाबून घ्या म्हणजे तळ्ल्यावर त्यामध्ये खव्याचे सारण भरता येईल.
कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये बालुशाहीचे गोळे मंद विस्तवावर दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्या. मग थंड करायला ठेवा.
एका जाड बुडाच्या भांड्यात साखर व पाणी मिक्स करून पाक बनवायला ठेवून सारखे हलवत रहा. साखर विरघळलिकी त्यामध्ये दुध घालून थोडा घट्ट पाक बनवून घ्या.
पाक झाल्यावर त्यामध्ये तळलेल्या बालुशाही घालून दोन तास तसेच ठेवा.
दोन तासा नंतर बालुशाही पाकामधून बाहेर काढून एक प्लेट मध्ये काढून २-३ तास तसेच ठेवा.
सजावटीसाठी: एका कढईमध्ये खवा घेवून थोडासा परतून त्यामध्ये पिठीसाखर, वेलचीपूड व ड्रायफ्रुट मिक्स करून घ्या. बाजूला काढून ठेवलेल्या प्रत्येक बालुशाहीवर खव्याचे सारण एक एक चमचा ठेवून मग सर्व्ह करा.
स्टफ बालुशाहीची चव अप्रतीम लागते.