चॉकलेट कुल्फी: समर सीझनमध्ये म्हणजेच उन्हाळ्यात आपण वेगवेगळे आईसक्रिम, कुल्फी, सरबते बनवत असतो. कारण आपल्याला गर्मीचा खूप त्रास होत असतो. चॉकलेट-कॉफी मलई कुल्फी ही एक छान डीश आहे. चॉकलेट हे सर्वांना आवडतेच त्याची कुल्फी अथवा आईसक्रिम बनवलेतर सर्वांना नक्की आवडेल. ही कुल्फी बनवतांना खवा, आटवलेले दुध, साखर, मिल्क पावडर, फ्रेश क्रीम. कोको पावडर, नेस कॉफी चॉकलेट सॉस वापरला आहे. कोको पावडर मुळे छान रंग येतो, नेस कॉफी मुळे छान फ्लेवर येतो, खवा वापरल्यामुळे त्याची चव सुंदर लागते, फ्रेश क्रीम मुळे छान क्रीमी कुल्फी बनते.
चॉकलेट-कॉफी मलई कुल्फी ही मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी अथवा पार्टीला किंवा इतर वेळी सुद्धा बनवता येते.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
सेट करण्यासाठी वेळ: ४-५ तास
वाढणी: ४-५ जणासाठी
साहित्य:
१ लिटर दुध (म्हशीचे)
३/४ कप खवा
३/४ कप साखर
१ टे स्पून कोको पावडर
१ टी स्पून नेस कॉफी
३/४ कप मिल्क पावडर
१/२ कप फ्रेश क्रीम
१/४ कप चॉकलेट सॉस
कृती:
प्रथम दुध गरम करायला ठेवून ते निम्मे होई परंत आटवून घ्या.
आटवलेल्या दुधामध्ये साखर, नेस कॉफी, कोको पावडर घालून पाच मिनिट मंद विस्तवावर गरम करून घेऊन थंड करायला ठेवा.
थंड झालेल्या दुधामध्ये मिल्क पावडर, फ्रेश क्रीम, चॉकलेट सॉस घालून मिक्सरमध्ये दोन मिनिट ब्लेंड करून घ्या.
एका अँलुमीनीयमच्या डब्यात अथवा कुल्फीच्या साच्यामध्ये मिश्रण ओतून डीप फ्रीजमध्ये ४-५ तास सेट करायला ठेवा.
चॉकलेट-कॉफी मलई कुल्फी सर्व्ह करतांना वरतून थोडासा चॉकलेट सॉस व ड्राय फ्रुटने सजवा मग सर्व्ह करा.