चीज-चिकन रोल: चीज चिकन रोल हे नाश्त्याला किंवा जेवणासाठी सुद्धा बनऊ शकतो. चिकन रोल हे पौस्टिक आहेत. कारण ह्यामध्ये चिकन, चीज, अंडे, पुदिना, टोमाटो, कांदा वापरला आहे. हे रोल लहान मुलांना खूप आवडतील.
The English language version of this chicken snsck can be seen here- Cheese Chicken Rolls
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ८ रोल बनतात
साहित्य: सारणासाठी:
८ चिकनचे मोठे तुकडे
१/४ कप पुदिना पाने (चिरून)
१ टी स्पून लिंबूरस
१ चीज क्यूब (किसून)
२ अंडी (फेटून)
आवरणासाठी:
२ कप गव्हाचे पीठ
१ टे स्पून तेल
मीठ चवीने
मसाल्यासाठी:
१ टे स्पून आले
१ टे स्पून लसूण
४ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गरम मसाला
१/४ टी स्पून हळद
हिरवी चटणी करीता:
१/२ कप कोथंबीर
१/२ कप ओला नारळ (खोऊन)
२ हिरव्या मिरच्या
७-८ लसूण पाकळ्या
१ टी स्पून लिंबूरस
१ टी स्पून साखर
मीठ चवीने
सजावटीसाठी:
१ कांदा (बारीक चिरून)
१ टोमाटो (बारीक चिरून)
मीठ चवीने
१/२ टी स्पून मिरे पावडर
तेल चिकन रोल शालो फ्राय करण्यासाठी
कृती:
आवरणासाठी: गव्हाचे पीठ, मीठ, तेल व पाणी मिक्स करून पीठ चांगले मळून घेवून त्याचे आठ एकसारखे गोळे बनवा.
हिरव्या चटणीसाठी: मिक्सरच्या जारमध्ये कोथंबीर, खोबरे, हिरवी मिरची, लसूण, लिंबूरस, मीठ चवीने, २ टे स्पून पाणी घालून चटणी वाटुन घ्या.
कांदा व टोमाटो चिरून घ्या व त्यामध्ये थोडेसे मीठ व मिरे पावडर घालून मिक्स करा. चीज किसून घ्या.
सारणा करीता: चिकनचे तुकडे धुवून त्यामध्ये एक कप पाणी घालून ८-१० मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या. चिकन शिजल्या वर हाडे वेगळी करून घेवून चिकनचे लहान लहान तुकडे करा.
एका कढईमधे एक टे स्पून तेल घेवून त्यामध्ये आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला घालून चिकनचे तुकडे घालून मीठ घाला व मंद विस्तवावर ५-७ मिनिट शिजवून घ्या. मग त्यामध्ये लिंबूरस, पुदिना चिरून घालून मिक्स करून त्याचे एक सारखे आठ भाग करा.
चिकन रोल बनवण्यासाठी: पिठाचा एक गोळा घेवून चपाती प्रमाणे लाटून घ्या. तवा गरम करून लाटलेली चपाती दोनी बाजूनी भाजून घ्या. अश्या सर्व चपात्या बनवून घ्या.
अंडे फेटून घ्या व एक टे स्पून फेटलेले अंडे चपातीच्या एका बाजूला लावून चपाती भाजून घ्या. मग चपातीला एका बाजूनी हिरवी चटणी लाऊन चिरलेला कांदा, टोमाटो घालून शिजवलेलल्या चिकनचा एक भाग पसरवून, किसलेले चीज घालून चपातीचा रोल बनवा. असे सर्व रोल बनवून घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करून चिकनचे रोल थोडे थोडे तेल घालून भाजून घ्या.
गरम गरम चिकन रोल टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.