कोबी-चीज टोस्ट: कोबी-चीज टोस्ट ही एक नाश्त्याला बनवायची डीश आहे. कोबी व चीज पौस्टिक आहेच. लहान मुलांना अशा प्रकारचे टोस्ट नक्की आवडतील.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
४०० ग्राम ब्राऊन स्लाईस ब्रेड
५०० ग्राम कोबी
२ मोठे बटाटे (उकडून)
४ चीज क्यूब (किसून)
४ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून मिरे पावडर
मीठ चवीने
बटर टोस्ट भाजण्यासाठी
कृती:
कोबी धुवून किसून घ्या. बटाटे उकडून सोलून कुस्करून घ्या. चीज किसून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या.
किसलेला कोबी, कुस्करलेला बटाटा, किसलेले चीज, हिरवी मिरची, मिरे पावडर, मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या.
ब्रेडच्या स्लाईसला एका बाजूनी बटर लाऊन घ्या. एक ब्रेडची स्लाईस घेऊन त्यावर कोबीचे एक टे स्पून सारण ठेऊन त्यावर दुसरी ब्रेडची स्लाईस ठेऊन नॉन स्टिक तवा गरम करून त्यावर ब्रेड भाजून घ्या.
गरम गरम कोबी चीज टोस्ट टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.