चॉकलेट पँन केक: चॉकलेट हे सगळ्यांना म्हणजे लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा आवडते. आपल्याला घरी चॉकलेटच्या बऱ्याच रेसिपी बनवता येतात. त्यापैकी चॉकलेट पँन केक ही एक रेसिपी आहे. चॉकलेट पँन केक ही डीश नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहा बरोबर बनवायला पण छान आहे. चॉकलेट पँन केक ही झटपट बनणारी व टेस्टी रेसिपी आहे. आपल्याला चॉकलेट सॉस सुद्धा घरी बनवता येतो.
The English language version of this Pan Cakes recipe preparation method can be seen here- Pancakes with Chocolate Sauce
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४-५ जणासाठी
साहित्य:
पँन केक बनवण्यासाठी
२ कप मैदा
२ अंडी (फेटून)
१ १/२ कप दुध
१/४ कप साखर
१ टी स्पून बेकिंग पावडर
१ टी स्पून व्ह्नीला इसेन्स
१/४ कप तेल
चॉकलेट सॉस करीता:
१ कप सोया क्रीम
१ कप डार्क चॉकलेट कंपाऊंड
१ टे स्पून बटर
कृती:
एका भांड्यात मैदा, फेटलेली अंडी, दुध, साखर, व्ह्नीला इसेन्स व एक टे स्पून तेल घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये बेकिंग पावडर घालून हलक्या हातानी मिक्स करून घ्या.
चॉकलेट सॉस बनवण्यासाठी: एका जाड बुडाच्या भांड्यात सोया क्रीम, किसलेले डार्क कंपाऊंड व बटर मिक्स करून दोन मिनिट गरम करून घ्या.
नॉन स्टिक तवा गरम करून त्यावर एक चमचा तेल लाऊन १/४ कप मैद्याचे मिश्रण ओतुन थोडे पसरून घ्या व बाजूनी थोडेसे तेल सोडून दोनी बाजूनी छान खरपूस भाजून घ्या.
गरम गरम पँन केक सर्व्ह करा व सर्व्ह करतांना वरतून चॉकलेट सॉसनी सजवा.