हनी चिकन: हनी म्हणजे मध हे आपल्याला माहीत आहेच मध वापरून बनवलेले चिकन हे खूप टेस्टी लागते. हनी चिकन बनवतांना त्यामध्ये गरम मसाले वापरलेले आहीत त्यामुळे हे चिकन मुलांना नक्की आवडेल. चिकनची ग्रेवी बनवतांना कांदा, आले, टोमाटो प्युरी वापरली आहे.
The Marathi language version of the preparation method of this chicken gravy recipe can be seen here- Honey Chicken Gravy
बनवण्यासाठी वेळ: ५० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
चिकन मुरण्यासाठी
१/२ किलो चिकनचे लेग पिसेस
१/४ कप आल्याचा रस
मीठ चवीने
ग्रेव्ही साठी:
३ मोठे कांदे (चिरून)
१ टी स्पून जिरे
१ टी स्पून धने
१” दालचीनी तुकडा
१ मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरून)
१ टे स्पून आले पेस्ट
१/४ कप टोमाटो प्युरी
१/२ टी स्पून मिरे पावडर
१ टे स्पून मध
२ टी स्पून वेलचीपूड
तेल चिकन फ्राय करण्यासाठी
मीठ चवीने
कृती:
चिकन मुरण्यासाठी: चिकनचे पिसेस धुवून त्याला आल्याचा रस व मीठ लावून २० मिनिट बाजूला ठेवा.
कढई मध्ये एक टे स्पून तेल गरम करून चिकनचे पिसेस शिजवून घ्या.
जिरे व धने हलके भाजून पावडर केऊन घ्या.
ग्रेव्ही बनवण्यासाठी: कढईमध्ये तेल गरम करून चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. थंड झाल्यावर बारीक वाटून घ्या.
फकढईमधे दोन टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये दालचिनीचा तुकडा, बारीक चिरलेला कांदा व आले पेस्ट घालून गुलाबी रंगावर परतून घ्या.
कांदा परतल्यावर त्यामध्ये वाटलेली कांदा पेस्ट घालून, धने-जिरे पावडर, टोमाटो प्युरी, मिरे पावडर, घालून पाच मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये मीठ व १/२ कप पाणी घालून ३-४ मिनिट शिजवून घ्या.
मग त्यामध्ये मध व वेलचीपूड घालून, चिकनचे पिसेस घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या.
गरम गरम चिकन जीरा राईस बरोबर सर्व्ह करा.