नवलकोल Knolkhol, Kohlrabi थालीपीठ: नवलकोलची भाजी ही गुणकारी असून पत्थ्कारक, पिक्त शामक असून शीत आहे. नवलकोलला अलकोल सुद्धा म्हणतात. नवलकोलचे थालीपीठ हे चवीस्ट लागते. हे नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा छान आहे.
The English version of the preparation method of this Thalipeeth can be seen here- Healthy Navalkol Thalipeeth
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप नवलकोल (किसलेला)
३/४ कप तांदुळाचे पीठ
३/४ कप गव्हाचे पीठ
३/४ कप ज्वारीचे पीठ
३/४ कप बाजरीचे पीठ
१ मोठा कांदा (बारीक चिरून)
१” आले (किसून)
५-६ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
१/२ कप कोथंबीर (बारीक चिरून)
१ कप नवलकोलची पाने (बारीक चिरून)
मीठ चवीने
तेल थालीपीठ फ्राय करण्यासाठी
कृती:
नवलकोल धुवून किसून घ्या. नवलकोलची पाने धुवून बारीक चिरून घ्या. कांदा व कोथंबीर बारीक चिरून घ्या.
तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, किसलेला नवलकोल, नवलकोलची चिरलेली पाने, कोथंबीर, आले, हिरवी मिरची, मीठ घालून पाणी घालून पीठ थोडेसे सैलसर मळावे. पीठाचे एक सारखे आठ गोळे बनवावे.
केळीच्या पाना वर एक गोळा थापून घ्या.
लोखंडी तवा गरम करून थोडेसे तेल लाऊन थापलेले थालीपीठ तव्यावर घालून बाजूनी तेल सोडून छान खरपूस भाजून घ्या.
गरम गरम थालीपीठ टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.