लाल भोपळ्याचे उपवासाचे रायते: लाल भोपळा हा नवरात्रीच्या उपवासाच्या वेळेला चालतो. साबुदाण्याच्या खिचडी बरोबर किंवा रताळ्याच्या किसाच्या बरोबर हे रायते चवीस्ट लागते. लाल भोपळ्याचे रायते बनवायला सोपे व लवकर होणारे आहे.
The English language version of the making of this Fasting Salad can be seen here- Lal Kaddu Ka Raita
बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२५० ग्राम लाल भोपळा
२ टे स्पून ओला नारळ (खोऊन)
२ हिरव्या मिरच्या (वाटुन)
१/४” आले तुकडा (वाटुन)
१ चिमुट दालचीनी पूड मीठ व साखर चवीने
फोडणीसाठी:
१ टे स्पून तूप
१/४ टी स्पून जिरे
कृती:
लाल भोपळ्याची साले काढून घ्या. भोपळ्याच्या लहान लहान पातळ फोडी करून घ्या.
एका कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये जिरे घालून हिरवी मिरची, आले घालून परतून घ्या मग त्यामध्ये दालचीनी पूड, मीठ व साखर घालून लाल भोपळ्याच्या फोडी घालून मिक्स करून पाच मिनिट झाकून ठेवा. मग सर्व्ह करा.