भरलेल्या भोपळी मिरच्या: भरलेल्या भोपळी मिरच्या किंवा भरलेली शिमला मिरची ही चवीला छान टेस्टी व खमंग लागते. भरलेली शिमला मिर्च बनवतांना मिरच्या मध्यम किंवा लहान आकाराच्या घ्याव्यात म्हणजे दिसायला पण चांगल्या वाटतात व चांगल्या शिजतात.
The preparation method of this Stuffed Capsicums recipe in English can be seen here – Tasty Bharli Shimla Mirchi
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ३ जणासाठी
साहित्य:
६ शिमला मिर्च
२ मोठे कांदे (चिरून)
२ टे स्पून हरबरा डाळ (भिजवून मग वाटावी)
मसाला वाटण्यासाठी
६ पाकळ्या लसूण
१” आल्याचा तुकडा
६ हिरव्या मिरच्या
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
४ टे स्पून तूप
कृती
शिमला मिर्च धुवून त्याची वरची देठ गोलाकार कापून घ्या. मसाला वाटुन घ्या.
एका खोलगट तव्यावर तूप गरम करून त्यामध्ये कांदा मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घेऊन त्यामध्ये वाटलेला मसाला घालून छान खमंग भाजावा. मग मसाला चिरलेल्या शिमला मिरच्यामध्ये भरून घ्या.
कढई गरम करून त्यामध्ये भरलेल्या शिमला मिरच्या ठेवा व वरून थोडा पाण्याचा हबका मारून मंद विस्तवावर शिजवून घ्या.