गाजर पकोडे: गाजराची भजी छान कुरकुरीत लागतात. बनवायला अगदी सोपी व चवीला पण वेगळी लागतात. गाजर हे पौस्टिक आहे ते आपल्याला माहीत आहेच ते आपल्याला गाजराचे गुणधर्म ह्या लेखात वाचायला मिळेलच. गाजराचे वडे सुद्धा म्हणता येईल, हे वडे बनवतांना बेसन वापरण्या आयवजी हरभरा डाळ भिजत घालून वाटुन मग त्याचे वडे बनवले आहेत त्यामुळे ते पचायला हलके होतात.
The English language version of this Carrot Pakoda recipe preparation method can be seen here – Gajar Ke Pakode
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
५ मोठ्या आकाराची गाजर
२ कप चनाडाळ (हरभरा डाळ)
१” आले तुकडा
६-७ लसूण पाकळ्या
६ हिरव्या मिरच्या
१ १/२ टी स्पून लाल मिरची पावडर
२ टे स्पून तेल (गरम)
मीठ चवीने
तेल वडे/पकोडे तळण्यासाठी
कृती:
हरभरा डाळ ३-४ तास पाण्यात भिजत घाला. मग पाणी काढून जाडसर वाटुन घ्या. गाजर धुऊन किसून घ्या. आले-लसूण-हिरवी मिरची जाडसर वाटून घ्या.
वाटलेली चणाडाळ, किसलेले गाजर, आले-लसूण-हिरवी मिरची, लिंबूरस, लाल मिरची पावडर, कोथंबीर, मीठ व गरम तेल घालून चांगले मिक्स करून घ्या.
कढईमधे तेल गरम करून घ्या. मग त्यामध्ये छोटे छोटे गोळे सोडून छान कुरकुरीत तळून घ्या.
गरम गरम वडे/पकोडे चटणीबरोबर किंवा टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.