चीज-अंडे पकोडा: चीज अंडे पकोडा किंवा चीज व अंड्याची भाजी ही स्टारटर म्हणून बनवता येतात. चीज व अंडे हे पौस्टिक आहेच. चीज व अंडी वापरून बनवलेले पकोडे हे चवीला छान लागतात.
The English language version of this Pakoda recipe preparation method can be seen here- Tasty Egg Pakoras
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
२ अंडी
१ कप चीज (किसून)
२ टे स्पून कोथंबीर
एक चिमुट खायचा सोडा
१/२ कप बेसन
१/२ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
मीठ चवीने
तेल किंवा तूप तळण्यासाठी
कृती:
अंडी फोडून फेटून घ्या. चीज किसून घ्या. कोथंबीर चिरून घ्या.
फेटलेल्या अंड्यात किसलेले चीज, कोथंबीर, बेसन, लाल मिरची पावडर, हळद, मीठ व सोडा घालून चांगले मिक्स करून घ्या.
कढईमधे तेल किंवा तूप गरम करून घेवून छोटे छोटे पीठाचे गोळे गरम तेलात सोडून छान भजी तळून घ्या.
गरम गरम भजी टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा,