कोलंबीची भजी-पकोडे: कोलंबीची भजी ही टेस्टी लागतात. ही भजी नाश्त्यासाठी किंवा स्टारटर म्हणून सुद्धा बनवता येतात. ह्यासाठी मोठी किंवा मध्यम आकाराची कोलंबी घेतली तर उत्तम होईल. कोलंबीची भजी बनवतात थोडी शिजवून मग त्याची भजी छान लागतात.
बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२५० ग्राम कोलंबी (सोलून)
मीठ चवीने
१/४ टी स्पून हळद
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून लसूण (ठेचून)
१ कप बेसन
१/२ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
तेल भजी तळण्यासाठी
कृती:
कोळंबी सोलून घ्या. सोलताना कोलंबी मधील काळा धागा काढावा. जर काळा धागा काढला नाहीतर पिक्त होऊ शकतो. कारण कोलंबी मधील काळा धागा पिक्त कारक असतो. कोलंबी धुवून त्याला मीठ, हळद, ठेचलेला लसूण, लाल मिरची पावडर लाऊन पाच-मिनिट बाजूला ठेवा.
कढईमधे १ टी स्पून तेल घालून भिजवलेली कोलंबी घालून मंद विस्तवावर शिजवून घ्यावी.
बेसनमध्ये मीठ, लाल मिरची पावडर व एक चमचा कडकडीत तेल घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये थोडेसे पाणी घालून थोडेसे सैलसर पीठ भिजवावे. पीठ फार घट्ट किंवा फार सैल नसावे.
कढईमधे तेल गरम करून एक एक कोलंबी घेऊन बेसनच्या पिठात बुडवून गरम तेलात छान कुरकुरीत तळून घ्यावी.