पनीर पुदिना कबाब: पनीर पुदिना कबाब हे नाश्त्याला किंवा स्टारटर म्हणून बनवता येतील. पनीरचे सगळेच पदार्थ टेस्टी लागतात. पनीरचे कबाब बनवतांना पनीर व त्यामध्ये पुदिना, चाट मसाला, ओवा, जिरे, शेंदेलोण मीठ व मेथीच्या दाण्याची पावडर वापरलेली आहे. त्यामुळे पनीरच्या कबाबची टेस्ट स्वादीस्ट लागते. बेसन वापरल्यामुळे छान खुसखुशीत होतात.
The English language version of the preparation method of this Kabab recipe can be seen here- Homemade Paneer
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: १० नंबर
साहित्य:
२५० ग्राम पनीर (पनीर बनवण्याची कृती बघा)
१ कप दही
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
१/२ टी स्पून हिरवी मिरची पेस्ट
१/२ कप पुदिना पाने
१/२ कप कोथंबीर
१ टे स्पून बेसन
१/२ टी स्पून जिरे
१/२ टी स्पून ओवा
१/४ टी स्पून शेंदेलोण मीठ
१/४ टी स्पून मेथी दाणे
मीठ चवीने
तेल कबाब तळण्यासाठी
कृती:
पनीर किसून घ्या. कोथंबीर, पुदिना चिरून घ्या, जिरे, ओवा, मेथी दाणे पावडर बनवून घ्या.
किसलेल्या पनीरमध्ये दही, आले-लसूण पेस्ट, ओवा-जिरे-मेथी पावडर, हिरवी मिरची चिरून, पुदिना कोथंबीर चिरलेली, बेसन, शेंदेलोण मीठ, चाट मसाला, मीठ चवीने घालून चांगले मळून घ्या. मग त्याचे एकसारखे १० लांबट गोळे बनवून घ्या.
कढईमधे तेल गरम करून घ्या व त्यामध्ये पनीर चे बनवलेले गोळे छान कुरकुरीत तळून घ्या.
गरम गरम कबाब काकडीच्या रायत्या बरोबर सर्व्ह करा.